Home /News /national /

अंत्यसंस्कारानंतर आला मृताचा रिपोर्ट, आता 19 जण कोरोना पॉझिटिव्ह; तर 350 होम क्वारंटाईन

अंत्यसंस्कारानंतर आला मृताचा रिपोर्ट, आता 19 जण कोरोना पॉझिटिव्ह; तर 350 होम क्वारंटाईन

अंत्यसंस्काराला हजर राहिलेल्या 25 लोकांपैकी 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे.

    तेलंगणा, 14 जून : देशात एकीकडे कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा वाढत असताना काही ठिकाणी मात्र अजूनही गांभीर्य दिसत नाही आहे. अशा परिस्थितीतही निष्काळजीपणाची प्रकरणं समोर येत आहेत. असाच एक प्रकार तेलंगणामध्ये घडला. तेलंगणामधील संगारेड्डी येथील एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळं अंत्यसंस्काराला हजर राहिलेल्या 25 लोकांपैकी 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. या सर्वांवर हैदराबादच्या गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय महिलेवर संगारेड्डी येथील जहीराबाद जवळील रुग्णालयात उपचार सुरू होते.9 जून रोजी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा कोरोना रिपोर्ट येण्याआधी तिचे शव कुटुंबाला देण्यात आले. मात्र रिपोर्ट आल्यानंतर ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. तोपर्यंत या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. वाचा-मुंबईतून गोड बातमी, कोरोनाबाधित मातांच्या सुखरूप प्रसूतीने पार केला 300 चा टप्पा असे सांगितले जात आहे की, या महिलेच्या अंत्यसंस्कार विधीस एकूण 25 जण उपस्थित होते. यापैकी 19 जणांना काही दिवसांत कोरोनाची लक्षणं दिसू लागली. डॉक्टरांनी सर्वांची कोरोना चाचणी केल्यानंतर या 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दरम्यान या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं तब्बल 350 लोकांना क्वारंटाइन केलं असून सर्वांची चाचणी केली जाणार आहे. वाचा-बाप रे! कोरोनावरील उपचारानंतर तरुणाला रुग्णालयानं पाठवलं 8.50 कोटींचं बिल वाचा-कोरोना संकटात केंद्राकडून पुण्याला शून्य रुपयाची मदत, धक्कादायक माहिती उघड संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या