जळगाव, 14 जून: जळगाव शहरासह जिल्ह्याला शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाचं चांगलं झोडपून काढलं. पावसामुळे साकेगाव परिसरात असलेल्या गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या तळघरात पावसाचं पाणी शिरलं. यामुळे रुग्णांना तातडीने इतर ठिकाणी हलवताना रुग्णालय प्रशासनाची मोठी तारांबळ उडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा..मुंबईत कोरोनाचा उद्रेक थांबेना, आजही सर्वात जास्त मृत्यू आणि नवे रुग्ण सापडले
जळगाव जिल्ह्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाच्या वतीने कोविड रुग्णांसाठी आणि नियमित रुग्णांच्या साठी गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय अधिग्रहित करण्यात आले आहे. रुग्णालय परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली. काही वेळातच पूरस्थिती निर्माण झाली. पाणी थेट गोदावरी रुग्णालयाच्या तळघरात शिरले. या तळ घरातच अपघातग्रस्त रुग्णांचा आपत्कालीन कक्ष आहे. याच कक्षात काही वेळातच गुडघ्या एवढे पाणी साचले. त्या ठिकाणी असलेल्या रुग्णांना भर पाण्यातून बाहेर काढताना रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी तारांबळ उडाली. मात्र, या ठिकाणी रुग्ण संख्या मर्यादित असल्याने रुग्णांना तातडीने इतर विभागात हलवण्यात यश मिळालं. तरी गोदावरी रुग्णालयात पूराचं पाणी शिरल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अंगावर काटा उभा राहिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.