मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बापरे! अमेरिकेत एका महिन्यात 270000 मुलं कोरोना पॉझिटिव्ह, जाणून घ्या जगाची स्थिती

बापरे! अमेरिकेत एका महिन्यात 270000 मुलं कोरोना पॉझिटिव्ह, जाणून घ्या जगाची स्थिती

Coronavirus outbreak in the World: गेल्या 4 आठवड्यांत मुलांची सुमारे 2 लाख 70 हजार रुग्ण (United States Corona Children's Cases) नोंदवण्यात आले आहेत. सप्टेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत लहान मुलांची 77 लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Digital Desk

वॉशिंग्टन, 24 मार्च : अमेरिकेत गेल्या एका महिन्यात सुमारे 2 लाख 70 हजार लहान मुलं कोरोना पॉझिटिव्ह (covid-19 positive) झाली आहेत. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (एएपी) आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, देशात 2 वर्षांपूर्वी महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे 1.28 कोटी मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. अहवालानुसार, 19 टक्के मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

गेल्या 4 आठवड्यांत मुलांची सुमारे 2 लाख 70 हजार रुग्ण (United States Corona Children's Cases) नोंदवण्यात आले आहेत. सप्टेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत लहान मुलांची 77 लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. रोगाच्या तीव्रतेचं तसेच नवीन प्रकारांशी संबंधित संभाव्य दीर्घकालीन प्रभावांचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक डेटा गोळा करण्याची तातडीची गरज आहे.

हे वाचा - Russia-Ukraine युद्ध सुरू असताना रशियात अचानक वाढलीय कंडोमची मागणी; विक्रीत 170 टक्क्यांनी वाढ

 चीनमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे

दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाने कहर केला आहे. शनिवारी चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी देशात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. जानेवारी 2021 नंतर नोंदवलेल्या मृतांच्या संख्येत ही पहिलीच वाढ आहे. चीनमध्ये, कोरोना विषाणूच्या अत्यंत संसर्गजन्य ओमिक्रॉन फॉर्मच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. संक्रमणामुळे दोन्ही मृत्यू ईशान्य जिलिन प्रांतात झाले आहेत.

हे वाचा - कोरोनाचं भयावह चित्र! रुग्णांच्या मृतदेहांचा खच; अंत्यसंस्कारासाठी एप्रिलपर्यंत वेटिंग

हिवाळी ऑलिम्पिकनंतर प्रकरणे वाढली

यानंतर चीनमध्ये मृतांचा आकडा 4,638 वर पोहोचला आहे. नॅशनल हेल्थ कमिशनचे अधिकारी जिओ याहुई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ज्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला ते वृद्ध रुग्ण होते आणि ते इतर आजारांनी ग्रस्त होते. त्यांनी सांगितलं की, त्यापैकी एकाला कोविड-19 ची लस देण्यात आलेली नाही. गेल्या महिन्यात चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या, त्यानंतर कोरोनाच्या प्रकरणांनी वेग घेतला.

First published:

Tags: America, Coronavirus, Coronavirus cases