मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा रेकॉर्ड, दर 16 पैकी एक व्यक्ती Covid Positive

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा रेकॉर्ड, दर 16 पैकी एक व्यक्ती Covid Positive

Covid cases in Britain: संसर्गाची बहुतेक प्रकरणं ओमिक्रॉनच्या BA.2 'स्टिल्थ व्हेरिएंट'मधून आली आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रोफेसर पॉल एलियट म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा ट्रेंड चिंताजनक आहे.

    लंडन, 8 एप्रिल : इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात कोविड-19 च्या बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत, प्रत्येक 16 पैकी एक व्यक्ती म्हणजेच लोकांना 6.37 टक्के दराने संसर्ग झाल्याचं आढळून आलं. हा दर फेब्रुवारीमध्ये नोंदलेल्या संसर्गाच्या दुप्पट आहे. नवीन अभ्यासातून असं आढळून आलंय की, फेब्रुवारीमध्ये प्रत्येक 35 लोकांची चाचणी करण्यात आली असून, एक व्यक्ती कोविड संक्रमित असल्याचं आढळून आलं होतं. ब्रिटनमधील लंडनच्या इंपीरियल कॉलेज केलेल्या दीर्घ 'रिअल-टाइम अ‌ॅसेसमेंट ऑफ कम्युनिटी ट्रान्समिशन (रिअॅक्ट-1)' च्या विश्लेषणात असं आढळून आलंय की, दर 30 दिवसांनी संसर्गाचा दर दुप्पट होतो. हे वाचा - डॉक्टर कसले, हे तर हैवान! मरण्यापूर्वीच काढायचे कैद्यांचे हृदय आणि फुफ्फुसं अभ्यासाच्या डेटानुसार, संसर्गाची बहुतेक प्रकरणं ओमिक्रॉनच्या BA.2 'स्टिल्थ व्हेरिएंट'मधून आली आहेत. हा अभ्यास 8 ते 31 मार्च दरम्यान सुमारे 1.10 लाख नमुन्यांवर आधारित आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रोफेसर पॉल एलियट म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा ट्रेंड चिंताजनक आहे. हे वाचा - इम्रान खान यांचे हाल जनरल मुशर्रफ यांच्यासारखे होणार? राजकीय तज्ज्ञ म्हणतात.. काळजी घेण्याचं आवाहन इम्पीरियल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे रिस्पॉन्स प्रोग्राम डायरेक्टर पॉल एलियट म्हणाले, 'देशातील निर्बंध संपले आहेत, परंतु, मी लोकांना आवाहन करेन की, संसर्गास असुरक्षित असलेल्या इतरांचं संरक्षण करण्यासाठी काळजीपूर्वक वागावे.' जपानने भारताच्या स्वदेशी कोवॅक्सिनला मान्यता दिली भारताची स्वदेशी कोविड-19 लस भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिनला जपानने मान्यता दिली आहे. जपानमधील भारतीय दूतावासानं एका ट्विटमध्ये म्हटले आहे की ज्यांना ही लस मिळाली आहे, ते 10 एप्रिलपासून जपानला जाऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांनी मार्च 2022 आणि सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या क्वाड समिटमध्ये विशेषतः कोविड-19 लसीच्या बाबतीत सकारात्मक आणि रचनात्मक कार्यसूचीला पाठिंबा दिला.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Corona updates, Covid cases, London

    पुढील बातम्या