जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / डॉक्टर कसले, हे तर हैवान! मरण्यापूर्वीच कैद्यांचे हृदय आणि फुफ्फुसं काढायचे; धक्कादायक माहिती उघड

डॉक्टर कसले, हे तर हैवान! मरण्यापूर्वीच कैद्यांचे हृदय आणि फुफ्फुसं काढायचे; धक्कादायक माहिती उघड

फोटो सौजन्य (Canva)

फोटो सौजन्य (Canva)

चिनी वैज्ञानिक जर्नल्समधील 2,838 अहवालांच्या फॉरेन्सिक रिपोर्टमधून असं दिसून आलंय की, 71 प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी रुग्णाचा मेंदू मृत होण्यापूर्वी त्याचे हृदय किंवा फुफ्फुसे काढून टाकली आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीजिंग, 07 एप्रिल : डॉक्टरांचे काम लोकांवर उपचार करणे आणि त्यांचे प्राण वाचवणे हे असते. पण, येथील काही डॉक्टरांवर हत्येचे गंभीर आरोप आहेत. शेकडो शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांवर प्रत्यारोपणासाठी (ट्रांसप्लांट) आलेल्या कैद्यांची हृदये मृत्यूपूर्वीच बाहेर काढल्याचा आरोप आहे. एका नवीन अॅकेडमिक पेपरमध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या (Organ transplantation) आचारसंहितेच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शरीरातून एखादा अवयव काढून टाकल्यामुळे दात्याचा मृत्यू होणं चुकीचं आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीने या आठवड्यात अमेरिकन जर्नल ऑफ ट्रान्सप्लांटेशनमध्ये (American Journal of Transplantation) प्रकाशित केलेल्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, चीनी शल्यचिकित्सकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. अल जझीराच्या मते, चिनी वैज्ञानिक जर्नल्समधील 2,838 अहवालांच्या फॉरेन्सिक रिपोर्टमधून असं दिसून आलंय की, 71 प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी रुग्णाचा मेंदू मृत होण्यापूर्वी त्याचे हृदय किंवा फुफ्फुसे काढून टाकली आहेत. वैद्यकीय भाषेत, ब्रेन डेड ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्ण व्हेंटिलेटरशिवाय जगू शकत नाही. हे वाचा -  चोरानं मंदिरातले दागिने चोरण्यासाठी खिडकी फोडली, पण नंतर मिळाली अशी काही शिक्षा व्यक्तीचा शेवट डॉक्टर हातून संशयास्पद सर्व 71 प्रकरणे 1980 ते 2015 दरम्यानची असल्याचे सांगण्यात येत आहे. 2015 मध्ये चीनने अधिकृतपणे कैद्यांचे अवयव घेण्यावर बंदी घातली होती. तोपर्यंत, बहुतेक अवयव प्रत्यारोपण मृत्यू झालेल्या कैद्यांकडून झाल्याचे मानले जात होते, कारण ऐच्छिक अवयवदान अत्यंत मर्यादित होते. अभ्यासानुसार, गोळीबार पथक किंवा प्राणघातक इंजेक्शनने सुरू झालेल्या कैद्यांना मारण्याच्या प्रक्रियेत चिनी शल्यचिकित्सक शेवटचा हात लावत असत. म्हणजे, जर कैदी जिवंत राहिले तर शल्यचिकित्सक त्यांचे अवयव काढून त्यांची हत्या करायचे. हे वाचा -  लष्कराची नवीन योजना! आता 3 ते 5 वर्षांसाठी भर्ती होऊ शकतात तरुण, लवकरच घोषणा डॉक्टर सरकारी मारेकऱ्यांसारखे वागायचे पीएचडी संशोधक आणि संशोधनाचे सह-लेखक मॅथ्यू रॉबर्टसन म्हणाले, ‘आम्हाला आढळून आलंय की, डॉक्टर हे सरकारी मारेकरी बनले आहेत आणि हत्येची पद्धत हृदय काढण्याची होती.’ संशोधकांचे म्हणणे आहे की, या निकषांवरून असे दिसून येते की, अवयव खरेदी करण्याच्या उद्देशाने रुग्णाचे शरीर जिवंत ठेवण्यात आले होते, ज्यामुळे डॉक्टर आणि रुग्णालयांना ‘मोठा फायदा’ होतो. संशयित प्रकरणांमध्ये 348 शल्यचिकित्सक, परिचारिका, भूलतज्ज्ञ आणि इतर वैद्यकीय कर्मचारी किंवा संशोधकांचा सहभाग आहे, ज्यांचा जर्नल्समध्ये समावेश करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात