मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनमध्ये मोठे बदल; भारतावर कसे होणार परिणाम

चीनमध्ये मोठे बदल; भारतावर कसे होणार परिणाम

चीनमध्ये मोठे बदल; भारतावर कसे होणार परिणाम

चीनमध्ये मोठे बदल; भारतावर कसे होणार परिणाम

चीनमधील राजकारणात मोठी उलथापालथ चालली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या आर्थिक मंदीचं सावट आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. आर्थिक मंदीची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे भारताशेजारील बलाढ्य देश चीनमध्ये मात्र मोठे बदल होत आहेत. चीनमधील राजकारणात मोठी उलथापालथ चालली आहे.

जेव्हा नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष, ली झांशु,नंतर नयांनी चिनी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस, हू जिंताओ, यांच्याकडून कागदपत्रे ओढली आणि लाल फोल्डरखाली लपविण्याचा प्रयत्न केला तेव्हाच खरतर 20 व्या चीनी कम्युनिस्ट पार्टी (CCP) काँग्रेसमध्ये गोष्टी अस्वस्थ होण्यास सुरूवात झाली. नंतर जेव्हा जिंताओ यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले तेव्हा मात्र चित्र नाट्यमय झाले.

या घटनेमागच्या कारणांचा उलगडा कधी झाला नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे डीन, श्रीकांत कोंडापल्ली यांच्यामते, कम्युनिस्ट युथ लीग (सीवायएल) सदस्यांना पॉलिटब्युरो स्थायी समितीमधून वगळण्यात आल्याने जिंताओ नाराज झाले, जे एकेकाळी "लीग गटाचा" प्रमुख चेहरा होते.

नेत्यांच्या नावांची घोषणा केल्यानंतर मंचावरील मतभेद टाळण्यासाठी शी जिनपिंग यांनी त्यांच्या सहाय्यकांना माजी सरचिटणीसांना बाहेर काढण्याचे निर्देश दिले. पण ही घटना म्हणजे मोठे आश्चर्य अनावरण होण्यापूर्वी फक्त एक सुरुवात होती: नियुक्त्यांमध्ये फेरबदल.

चिनी घुसखोरी व्हाया इन्स्टंट लोन अ‍ॅप? अनेक कर्जदाराच्या आत्महत्या, Peytm, रेझरपे ED च्या रडारवर

चीनमध्ये मोठे बदल

सर्वात आश्चर्यकारक नियुक्ती होती ती म्हणजे स्थायी समितीच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ली कियांग यांची. "सर्वांना चेन मिनर, जे आता चोंगकिंग पक्षाचे सचिव आहेत, यांची नियुक्ती सेकंड-इन-कमांड म्हणून अपेक्षित होती", कोंडापल्ली सांगतात. ते स्पष्ट करतात की 19व्या पक्षाच्या काँग्रेसमध्येही चेन यांना पॉलिटब्युरोचे स्थायी समिती सदस्य बनवायचे होते, पण ते देखील अज्ञात कारणांमुळे झाले नाही.

कियांग यांच्या कडक झिरो कोविड पॉलिसी लागू करण्याने शांघायमध्ये हाहाकार माजला होता. या गोंधळावर पांघरूण टाकून त्यांना देशाचा पुढचा पंतप्रधान बनवतील असे कोणालाही वाटले नव्हते.

कोंडापल्ली म्हणाले, "खरं तर, त्यांच्या धोरणांना मिळालेल्या प्रतिक्रिया लक्षात घेता, प्रत्येकजण असा विचार करत होता की त्यांनी शांघायमधील पक्ष सचिव पदाचा राजीनामा द्यावा लागेल."

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? बीजिंगहून 6000 उड्डाणे रद्द झाल्याने देशात अफवांना पेव

शी-ली समीकरण यशस्वी ठरेल?

शी-ली समीकरण जागतिक आघाडीवर कोणत्या मार्गाने यश मिळवू शकते, विशेषत: लींच्या मर्यादित आंतरराष्ट्रीय अनुभवासह, यावर भाष्य करताना कोंडापल्ली म्हणाले की ली यांना ताबडतोब उपाध्यक्ष बनवणे आणि नॅशनल पीपल्स काँग्रेसची बैठक होईपर्यंत त्यांना तयार करणे हा एक तडजोडीचा उपाय आहे.

मार्च मध्ये होणाऱ्या काँग्रेसमधील घोषणेनंतर ते पंतप्रधानपदी कायम राहतील. कोंडापल्ली पुढे म्हणाले, "ली कियांग यांना मार्चमध्येच प्रीमियर केले जाऊ शकते, आता नाही."

आणखी दोन महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या. त्यात पहिली म्हणजे वांग हुनिंग यांची. ते निओ- ऑथॉरिटेरिअन धोरणांचे शिल्पकार आणि जियांग झेमिन, हू जिंताओ आणि आता शी यांच्या शासनाचे पटकथा लेखक. अनुभवी वांग हे सर्व कन्सरवेटीव कार्यक्रमांसाठी ओळखले जातात.

उदाहरणार्थ, सोशल क्रेडिट सिस्टम. या कार्यक्रमांतर्गत, लोकांवर QR कोड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सॅटेलाईट्स च्या मदतीने त्यांचे विस्तृतपणे निरीक्षण केले जाते. आणि त्यांच्या नैतिक वर्तनासाठी गुण दिले जातात. अशा कडक कायद्यांचे ते समर्थक आहेत.

दुसरी नियुक्ती महत्वाची नियुक्ती झाली ती म्हणजे जनरल हे वेइडोंग यांची. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) अंतर्गत सर्वात मोठी लष्करी कमांड, वेस्टर्न थिएटर कमांडचे उपाध्यक्षपद जनरल वेइडोंग यांना दिले गेले. कोंडापल्ली म्हणाले, "थिएटर कमांडर म्हणून ते डोकलाम आणि अक्साई चिनजवळील भागांच्या जवळ गेले आहेत.

S Jaishankar : चीन-तुर्की-पाकचा सामना करण्यापासून ते UN सुधारणांपर्यंत, जयशंकर यांनी मांडली रोखठोक बाजू

" त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या जागांच्या वास्तविकतेची चांगली जाणीव आहे आणि त्यामुळे भारताच्या सुरक्षेवर मोठा परिणाम होईल. त्याच्यासोबत, जनरल वांग हैजियांग आणि जनरल जू क्विलिंग, जे लाइन ऑफ एक्चुल कन्ट्रोल (एलएसी) तज्ञ आहेत, त्यांनाही बढती देण्यात आली.

चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष डेंग झियाओपिंग यांनी तरुण नेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पॉलिटब्युरो स्टँडिंग कमिटीचे सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा 68 असावी असा प्रस्ताव दिला होता. मात्र वास्तविक निवड प्रक्रियेदरम्यान असे सर्व नियम तोडण्यात आले. उदाहरणार्थ, कम्युनिस्ट युथ लीग (सीवायएल), 14 ते 28 वयोगटातील तरुणांसाठी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची युवा चळवळ, निवड प्रक्रियेत विचारात घेतली गेली नाही.

या गटांमधील संभाव्य प्रतिक्रियांवर भाष्य करताना, कोंडापल्ली म्हणाले, "ते शांत बसणार नाहीत कारण या सर्वांना सर्वोच्च निर्णय प्रक्रियेतून काढून टाकण्यात आले आहे." ली केकियांग,एक मेहनती, सेंट्रीस्ट आणि, कोंडापल्लीच्या शब्दात, "लघु आणि मध्यम उद्योगांचे प्रिय" असणाऱ्या सुप्रसिद्ध नेत्याला देखील वगळण्यात आले. म्हणून, प्रतिशोध होईल, परंतु तो गर्भित असेल आणि जगाला दिसेल असा नाही. हू जिंताओ यांची स्टेजवरची प्रतिक्रिया त्याचा पुरावा आहे.

अजेंडा काय असेल?

शी यांच्या भाषणात “सुरक्षा (सिक्युरिटी),” “राष्ट्रीय कायाकल्प” (नॅशनल रिजुविनेशन) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे “Sinicization of religion” (सिनिकायझेशन ऑफ रिलिजन) या शब्दांचा उल्लेख होता. हे शब्द अल्पसंख्याकांविरुद्ध चिनी राष्ट्राध्यक्षांचा अजेंडा दर्शवतात. "तिबेटचे सिनिकायझेशन, शिनजियांगचे सिनिकायझेशन" हे शब्द गेल्या दोन वर्षांपासून वापरले जात आहेत. "मला वाटते की ते या प्रदेशांच्या सिनिकायझेशनचा एक भाग म्हणून ethnic अल्पसंख्याकांना आणखी दडपतील," कोंडापल्ली यांनी नमूद केले. त्यांच्या मते, सिनिकायझेशन म्हणजे स्थानिक संस्कृती, धर्म, वांशिकता इत्यादी बदलून हान समुदायाचे वर्चस्व प्रस्थापित करणे.

नेमकं काय म्हणाले शी?

शी यांच्या भाषणातील आणखी एक उल्लेखनीय वाक्य म्हणजे "इतिहासाची चाके चीनच्या एकीकरण आणि कायाकल्पाकडे वळत आहेत." या वाक्यात तैवानसाठी काही संकेत आहेत का, हे स्पष्ट करताना कोंडापल्ली म्हणाले, "युक्रेनच्या विपरीत, तैवान ही अधिक सुसज्ज लष्करी शक्ती आहे." त्यामुळे, हे शीसाठी हा सोपा मार्ग नाही. देशाचे पुनर्मिलन म्हणजे रक्तपात होईल आणि चिनी नेत्यांना याची जाणीव आहे.

जगावर काय परिणाम होऊ शकतात?

20 व्या CCP काँग्रेसमध्ये घोषित केलेल्या संरचनात्मक बदलांचा चीनच्या देशांतर्गत राजकारणावर आणि जगासाठीही व्यापक परिणाम होईल. कोंडापल्ली म्हणाले, "पॉलिटब्युरो स्थायी समितीमधील सर्व निष्ठावंत शी जिनपिंग यांना धोरणात्मक समन्वयाच्या दृष्टीने बरीच जागा प्रदान करतील." थोडक्यात, सत्तेवरील शींची पकड पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाली आहे.

First published:

Tags: China, India china, Xi Jinping