जाहिरात
मराठी बातम्या / देश / S Jaishankar : चीन-तुर्की-पाकचा सामना करण्यापासून ते UN सुधारणांपर्यंत, जयशंकर यांनी मांडली रोखठोक बाजू

S Jaishankar : चीन-तुर्की-पाकचा सामना करण्यापासून ते UN सुधारणांपर्यंत, जयशंकर यांनी मांडली रोखठोक बाजू

S Jaishankar : चीन-तुर्की-पाकचा सामना करण्यापासून ते UN सुधारणांपर्यंत, जयशंकर यांनी मांडली रोखठोक बाजू

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या 77 व्या परिषद होत आहे. दरम्यान या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर गेले आहेत. (S Jaishankar)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या 77 व्या परिषद होत आहे.  दरम्यान या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर गेले आहेत. यादरम्यान त्यांनी या परिषदेत जोरदार भाषण केले आहे. यावर जागतिक नेत्यांनी जागतिक शांतता आणि विकासासाठी भारताच्या वचनबद्धतेबद्दल प्रशंसा केली.

UNGA मध्ये, परराष्ट्र मंत्र्यांनी ग्लोबल साउथमधील भागीदारांसह तसेच पश्चिमेकडील सहयोगी देशांसोबत बैठका झाल्या यामध्ये भारताला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. UNGA मधील त्यांच्या बैठकांमध्ये आणि तसेच शिखर परिषदेच्या बाजूला झालेल्या बैठकांमध्ये, जयशंकर यांनी UNSC सुधारणावर जोरदार भाषण केले. दहशतवादाच्या प्रायोजकांना त्यांनी थेट आव्हान दिले. या अशांत जगात भारत कशा प्रकारे सद्भावना देऊ शकतो याचेही दाखले जयशंकर यांनी दिले.

जाहिरात

हे ही वाचा :  Chrome Alert: गुगल क्रोम वापरत असाल तर सावधान, बँक खातं होऊ शकतं रिकामं

दहशतवादाला आळा घालण्यासाठी हे केले, असे स्पष्टीकरण देऊन तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकत नाही. एफ-१६ विमाने कुठे तैनात केली जाऊ शकतात आणि ती किती विध्वंस घडवून आणू शकतात, हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहीत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, काही लोक पक्षपाती असतात. त्यांची भारतात सरशी होत नाही. ते देशाच्या बाहेर जिंकण्याचा प्रयत्न करतात.  

मी माध्यमांत येणारी वृत्ते वाचतो. काही वृत्तपत्रे काय लिहिणार आहेत हे तुम्हाला चांगल्याप्रकारे ठाऊक असते. येथेही असे एक वृत्तपत्र आहे, असे जयशंकर म्हणाले. तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांनी टाळ्या वाजवून जयशंकर यांच्या विधानाचे समर्थन केले.

रशियाच्या सैन्य उपकरणांवर भारताचे अवलंबित्व आणि रशियासोबत मजबूत संबंध असण्याचे हे कारण नाही की, भारताने ही उपकरणे मिळविण्यासाठी अमेरिकेशी संपर्क केला नाही, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले.

जाहिरात

हे ही वाचा :  PFI संघटनेभोवती फास आवळला, औरंगाबाद, नांदेडमध्ये ATS चे छापे, अनेक जण अटकेत

ते म्हणाले की, १९६५ पासून जवळपास ४० वर्षांपर्यंत भारतात अमेरिकेचे कोणतेही सैन्य उपकरणे आली नाहीत. याच काळात भारत- सोव्हिएत, भारत - रशिया संबंध मजबूत झाले. ते म्हणाले की, टाळी दोन्ही हातांनी वाजते. असे नाही की, सर्व समस्या अमेरिकेकडून होत्या. मला वाटते आज हे संबंध वेगळ्या स्तरावर आहेत. अनेक क्षेत्रात एकत्र काम करण्याची शक्यता आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात