बीजिंग, 25 सप्टेंबर : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबद्दल जगभरात चर्चा सुरू आहे. त्यांची खुर्ची धोक्यात असल्याचेही बोलले जात आहे. बीजिंग विमानतळावरून 6,000 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. यानंतर शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याच्या अफवा इंटरनेटवर पसरू लागल्या आहे. वास्तविक, गेल्या दोन वर्षांत शी जिनपिंग क्वचितच त्यांच्या राष्ट्रपती भवनातून बाहेर पडले असतील. ते केवळ अधूनमधून कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या प्रमुख नेत्यांना भेटले. यादरम्यान, कोविड -19 चा हवाला देत ते कोणत्याही जागतिक नेत्याला भेटले नव्हते. एपी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, दोन वर्षांनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष नुकतेच उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या 22व्या शिखर परिषदेत सहभागी झाले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे शी जिनपिंग या बैठकीत कमी सक्रिय होते. त्यांनी शिखर परिषदेला हजेरी लावली पण त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन किंवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतली नाही. एससीओ शिखर परिषदेतून ते अचानक निघून गेले. एका अहवालानुसार, चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ आणि चीनचे माजी पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी स्थायी समितीचे माजी सदस्य साँग पिंग यांचे मन वळवून सेंट्रल गार्ड ब्युरोचे नियंत्रण परत घेतले. चीनच्या पॉलिटब्युरोच्या स्थायी समितीच्या सदस्यांना आणि इतर सीसीपी नेत्यांना वैयक्तिक सुरक्षा प्रदान करणे हे सीजीबीचे काम आहे. शी जिनपिंग यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ह्या समितीकडे आहे. चीनमधील सोशल मीडियावर अशी भीती व्यक्त केली जात आहे की आता शी जिनपिंग यांचे लष्करी अधिकार कमी करणे ही कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत बंडाची तयारी असू शकते. वाचा - बड्या नेत्यांना घेऊन जाणारं Helicopter Crash, विजेच्या तारेचा स्पर्श होताच…; अंगावर काटा आणणारा Video कदाचित चीनमध्ये काय चालले आहे हे लक्षात आल्यानंतर शी जिनपिंग यांनी घाईघाईने 16 सप्टेंबर रोजी एससीओ बैठक सोडली. देशाला रवाना होण्यापूर्वी त्यांनी एससीओ शिखर परिषद अधिकृतपणे घोषित होण्याची वाट पाहिली नाही. चीनच्या राष्ट्राध्यक्षांना विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असून ते सध्या झोंगनानहाई येथे नजरकैदेत असल्याचे समजते. चीनमधील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे काही काळासाठी रद्द करण्यात आली आहेत. तिकीट विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे आणि सीसीपी चीनमधील आणि बाहेरील वाहतुकीवर लक्ष ठेवत आहे. शी जिनपिंग यांना हटवण्यासाठी सत्तापालट होऊ शकतो. असे झाल्यास 2019 मध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यानंतर चीनमधून बाहेर पडणारी ही सर्वात मोठी बातमी ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.