बॅंक अधिकाऱ्यांनेच केली तिजोरी रिकामी, घरच्या कपाटात लपवले 205 कोटी

बॅंक अधिकाऱ्यांनेच केली तिजोरी रिकामी, घरच्या कपाटात लपवले 205 कोटी

‘लै’ भारी राव! बॅंकेत पैसे सुरक्षित नाहीत म्हणून कर्मचाऱ्याने 205 कोटी...

  • Share this:

बीजिंग, 16 जानेवारी : बॅंकेत पैसे सुरक्षित राहतात म्हणून लोक घरात जास्त संपत्ती ठेवत नाहीत. मात्र चीनमध्ये एका व्यक्तिने बॅंकेतून पैसे काढून घरातल्या कपाटात चक्क 200 दशलक्ष युआन (सुमारे 205 कोटी रुपये) रोख रक्कम ठेवली होती. या व्यक्तिच्या घरात सरकारी अधिकाऱ्यांनी छापे टाकल्यानंतर या सगळा प्रकार उघडकीस आला. या कर्मचाऱ्याने हे सर्व पैसे चार कपाटात ठेवले होते.

मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार करणारा अवलिया काही लहान व्यक्ती नाही. ते चीनमधील एका बँकेचे माजी प्रमुख राहिले आहेत. या अवलियाचे नाव आहे लै झियाओमीन. लै चीन हुआरॉँग मॅनेजमेंट कंपनीचे माजी प्रमुख होते. त्यांच्या इमारतीतील एका खोलीत एकूण चार कपाटांमध्ये मिळून 205 कोटी रोख रक्कम मिळाली आहे. या निधीमुळे लै यांच्या बँकेलाही खूप त्रास सहन करावा लागला. कारण त्यांनी लाच घेतलेली रक्कम केवळ त्यांच्या बँकेच्या ग्राहकांना दिली होती.

वाचा-धक्कादायक! धर्मगुरूंनी महिलेशी थाटला संसार, हनीमूनआधीच लागली वाट आणि...

57 वर्षीय लै झियाओमीन स्वत: एका टीव्ही डॉक्युमेंटरी प्रोग्राममध्ये त्यांनी आपल्या संपत्तीबाबत खुलासा केला होता. मुख्य म्हणजे लै यांनी आपल्या घरात ठेवलेला एकही रुपया खर्च केलेला नाही आहे. अखेर अधिकाऱ्यांनी छापे टाकल्यानंतर सर्व पैसे सरकारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. यानंतर, चीन सरकारने लै झियाओमीनवर लाच, भ्रष्टाचार आणि दोन-दोन लग्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

वाचा-काय! हार्दिक पांड्याने रानू मंडलसोबत साखरपुडा केला? सोशल मीडियावर फोटो ट्रोल

वाचा-VIDEO: गाढवाची स्वारी करणारा पाकिस्तानी अँकर आता झाला महाराजा

लै झियाओमीन यांना 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर 1.6 अब्ज युआन (सुमारे 1696 कोटी रुपये) लाच घेतल्याचा आरोप होता. चिनी माध्यमांनी त्यांना देशातील सर्वात भ्रष्ट आर्थिक अधिकारी म्हटले.

First published: January 17, 2020, 12:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading