मुबंई, 15 जानेवारी: क्रिकेटर हार्दिक पांड्याने मॉडेल नताशा हिच्यासोबत अलिकडेच साखरपुढा उरकला. त्याच्या हटके आणि रोमँटिक साखरपुड्याची सोशल मीडियावर धम्माल चर्चा झाली. या खास क्षणाचे अनेक फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. पण या फोटोंनंतर आता हार्दिक प्रचंड ट्रोल होत आहे. नताशानंतर हार्दिक पांड्याने हल्लीच प्रसिद्ध झालेली गायक रानू मंडल हिच्याशी साखरपुडा केल्याच्या चर्चा आणि फोटो सोशल मीडियावर दंगा घालत आहेत. हार्दिक पांड्याला अनेक लोक ट्रोल करत आहे आणि त्याचे मिम्स सुद्धा तयार करत आहे. नताशाच्या फोटोच्या जागी रानू मंडलचा फोटो एडिट करुन तो फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यासोबत क्रिकेटर हार्दिक पांड्या यालासुद्धा ट्रोल केले जात आहे. हार्दिकसोबत रानू मंडलच्या फोटोवर फॅन वेगवेगळ्या प्रकारे रिएक्ट करत आहे.
हार्दिक पांड्या हा भारत आणि ऑस्टोलिया यांच्यामधील वन डे सीरिजचा हिस्सा नव्हता. कारण तो फिटनेस टेस्टमध्ये पास झाला नाही. तसेच नताशादेखील शेवटच्या वेळेस बॉलिवूड सिनेमा ‘द बॉडी’ मध्ये इमारान हाशमी आणि ऋषि कपूर यांच्यासोबत दिसली होती.
Who Fixed it man ! 😂😂#HardikPandya #NatasaStankovic pic.twitter.com/sxPu7N6LuS
— Sana Snap (ثناء اللہ) (@sanaullahalam11) January 14, 2020
कोलकताच्या रेल्वे स्टेशनवर गाण गाणारी रानू मंडल ही तिच्या गाण्यामुळे एका रात्रीत सोशल मिडियावर फेमस झाली. तिचा गाण्याचा व्हिडिओपाहून हिमेश रेशमिया याने तिला सिनेमामध्ये गाणं गाण्याची संधी दिली. त्यानंतर अनेक कारणांमुळे रानू मंडल ही चर्चेत राहिली. रानू मंडलचा अलिकडेच एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये ती आपल्या फॅनच्या सेल्फी रिक्वेस्टवर भडकली असल्याचं दिसलं होतं.