टेल अव्हिव, 16 मे : इस्रायलमध्ये चीनेचे राजदूत दू वी (Du Wei) यांचा त्यांच्या घरी हर्जलिया याठिकाणी मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या विदेश मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. येरूशलम पोस्टच्या एका अहवालानुसार पोलीस त्यांच्या घरी तपास करत आहेत. मात्र अद्याप चिनी दुतावासाने यासंदर्भात कोणती माहिती दिलेली नाही. आर्मी रेडिओचा हवाला देत असे सांगण्यात येत आहे की, त्यांच्या घरी हिंसा झाल्याचे कोणते पुरावे आढळले नाही आहेत. तपास करणाऱ्यांच्या मते दू वी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असण्याची शक्यता आहे. याच दरम्यान इस्रायलच्या विदेश मंत्रालयाचे डायरेक्टर युवल रोटेम यांनी चीनचे उपराजदूत देई यूमिंग यांच्याबरोबर बातचीत करून त्यांनी दु:ख व्यक्त केलं. रोटेम यांनी असं आश्वासन दिले आहे की विदेश मंत्रालयाकडून योग्य ती सर्व मदत केली जाईल (हे वाचा- कोविड-19चे सुरुवातीचे नमुने नष्ट केले, आरोग्य अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा ) अशी माहिती मिळते आहे की, दू वी यांचा त्यांच्या बेडवरच मृतदेह सापडला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात एक पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांचा परिवार त्यांच्याबरोबर नाही राहत. ते फेब्रुवारी महिन्यामध्येच इस्रायलमध्ये राजदूत बनून आले होते. चीनमध्ये कोरोना व्हायरसचे मोठ्या प्रमाणात संक्रमण झाल्यामुळे ते याठिकाणी 14 दिवस क्वारंटाइन देखील राहिले होते. त्याआधी ते युक्रेनचे राजदूत होते. दरम्यान इस्रायलमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. दीर्घ काळासाठी सुरू असलेल्या राजकीय विरोधानंतर रविवारी बेंजामिन नेत्यान्याहू राष्ट्रपती पदासाठी शपथ घेणार आहेत (हे वाचा- रेस्टॉरंटने पंतप्रधानांना म्हटलं जागा नाही, टेबल रिकामं होईपर्यंत बघितली वाट )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.