कोविड-19चे सुरुवातीचे नमुने नष्ट केले, आरोग्य अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

कोविड-19चे सुरुवातीचे नमुने नष्ट केले, आरोग्य अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

चीनच्या वुहानपासून जगभरात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना पसरण्यास सुरुवात झाली.

  • Share this:

पेइचिंग, 17 मे : चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातला आहे. लाखो लोकांवर उपचार सुरू आहेत. हा कोरोना व्हायरस चीनच्या लॅबोरेट्रीमध्ये तयार करण्यात आल्याचे अनेक चर्चा होत आहेत. त्यामुळे चीनला आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेचा सामना करावा लागत आहे. एका आरोग्य अधिकाऱ्यानं केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं आहे. चीननं कोरोनाचे विषाणूचे सुरुवातीचे काही नमुने नष्ट केल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. कोरोनाचा संसर्ग पसरण्याच्या भीतीनं तज्ज्ञ आणि संशोधनानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

अमेरिकेनं कोरोनावरून चीनला चांगलंच धारेवर धरलं आहे. कोरोना व्हायरस कसा पसरला आणि पहिल्यांदा समजल्यानंतर रोखण्यासाठी का प्रयत्न केला नाही असा सवालही विचारण्यात आला. देशाचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी यापूर्वी असा आरोप केला आहे की जागतिक महामारीच्या बाबतीत देशातील कम्युनिस्ट पक्ष आंतरराष्ट्रीय पारदर्शकतेखाली आहे. चीनने व्हायरसचे नमुने नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हे वाचा-भयंकर! देशात 24 तासांत 4 हजार 900 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह

WHO ला सांगण्याआधीच नष्ट केले होते नमुने

डिसेंबरच्या शेवटी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये SARS सारख्या जीवघेणा विषाणूची माहिती समोर आली होती. त्यानंतर चीनकडून काही नमुने नष्ट करण्यात आले होते. अहवालानुसार चीनने जागतिक आरोग्य संघटनेला यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर दोन आठवड्यांनी चीननं कोरोना व्हायरससंर्भात माहिती जगाला दिली होती. चीननं माहिती लपवल्यामुळे या व्हायरसवर लस तयार करण्यासाठी वेळ लागत असल्याचंही सांगितलं जात आहे.

हे वाचा-कोरोनाच्या संकटात शहीद जवानाच्या पत्नीची मदत, आयुष्यभर साठवलेले पैसे केले दान

चीनच्या वुहानपासून जगभरात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. चार महिन्यांनंतरही कोरोनावर कोणतीही लस किंवा ठोस उपाय शोधता आलेला नाही आहे. यातच जागितक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी लवकरच कोरोनाची लस मिळेल, असे सांगत एक आशेचा किरण दाखवला. मात्र आता WHOने कोरोना कधीच नष्ट होणार नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. WHO ने स्पष्ट केले आहे की, असेही होऊ शकते की कोव्हिड-19 कधीच नष्ट होणार नाही. त्याच्यासोबत जगायची सवय लावून घ्यावी लागेल.

हे वाचा-अर्थमंत्री निर्मला सीतारामन LIVE : आज 'या' क्षेत्रांना मिळणार दिलासा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 17, 2020, 12:11 PM IST

ताज्या बातम्या