• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • सावधान! Out of Control झालेलं चीनचं रॉकेट आज पृथ्वीवर आदळणार, मोठ्या नुकसानाची भीती

सावधान! Out of Control झालेलं चीनचं रॉकेट आज पृथ्वीवर आदळणार, मोठ्या नुकसानाची भीती

कोरोनानंतर (Coronavirus) पुन्हा एकदा चीनमुळं जगावर भयंकर संकट आलं आहे. 29 एप्रिलला चीननं 'लाँग मार्च 5 बी' (Long March 5B ) नावाचं रॉकेट (rocket) लाँच केलं होतं. तज्ज्ञांच्या मते हे रॉकेट चीनच्या नियंत्रणाबाहेर गेलं असून ते फुटलंय.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 मे: नियंत्रण हरवून बसलेलं चीनचं रॉकेट गेल्या काही दिवसांपासून अंतराळात चारही दिशांना चकरा मारत असल्याचं तज्ज्ञांच्या निदर्शनास आलं होतं. दरम्यान हे रॉकेट पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे चिंता वाढली आहे. काही मीडिया अहवालांनी तज्ज्ञांच्या हवाल्याने अशी माहिती दिली आहे की,  अंतराळात भरकटलेलं हे रॉकेट शनिवारी म्हणजे आजच पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते वातावरणात प्रवेश करण्याआधी जर हे रॉकेट जळालं तर जोखीम कमी होईल. जर अधिक लोकसंख्या असणाऱ्या परिसरात हे रॉकेट कोसळलं तर अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोरोनानंतर (Coronavirus) पुन्हा एकदा चीनमुळं जगावर संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 29 एप्रिलला चीननं 'लाँग मार्च 5 बी' (Long March 5B ) नावाचं रॉकेट (rocket) लाँच केलं होतं. तज्ज्ञांच्या मते हे रॉकेट चीनच्या नियंत्रणाबाहेर गेलं असून ते फुटलंय. स्पेस स्टेशन ' Heavenly Palace' साठी आधी हे मोड्यूल लाँच करण्यात आलं होतं. हे वाचा- Coronavirus: भारताच्या कठीण काळात आम्ही सोबत; अमेरिकेनं दिलं मदतीचं आश्वासन मीडिया अहवालांच्या मते या रॉकेटची लांबी 100 फूट आहे. या रॉकेटचं नियंत्रण सुटण्याआधी त्याने पृथ्वीभोवती 30 हून अधिक प्रदक्षिणा मारल्या आहेत. एका तासात 28000 मैल अंतर पार करणाऱ्या या रॉकेटचं वजव 21 टन आहे. नियंत्रणाबाहेर गेलेलं हे रॉकेट जरी समुद्रात आदळलं तरी देखील कमी नुकसान होऊ शकतं. काय होता चीनचा प्लॅन? या रॉकेटच्या मदतीनं चीन अंतराळात Tiangong (टियानगाँग) नावाचं स्पेस स्टेशन तयार करणार होता. 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता. हे स्टेशन पृथ्वीभोवती फेऱ्या मारून अंतराळातील माहिती चीनला पाठवणार होतं. मात्र, आता रॉकेटचं फुटल्यानं चीनचा प्लॅन फसला आहे. फुटलेलं रॉकेट पृथ्वीवर पडून नुकसान होण्याच्या शक्यते बाबत चीनलाही कल्पना आहे. मात्र, अद्याप त्यांनी याची माहिती जाहीर केलेली नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे वाचा-इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधून 160 दिवसांनी परतले, अंतराळविरांनी सांगितला थरारक अनुभव अंतराळातील घडामोडींचं निरीक्षण करणाऱ्या जोनाथन मॅक्डोवेल (Jonathan McDowell) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचं रॉकेट अंतराळात (space) फुटलं आहे. त्यांचे अवशेष अंतराळात पसरले असून ते वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहेत. या अवशेषांची स्थिती पाहता त्यामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. न्यूयॉर्क (New York), माद्रिद (Madrid), बीजिंग (Beijing), चिली (Chile) आणि न्युझीलंडच्या (New Zealand) काही भागांत हे अवशेष पडू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनचं 100 फुट लांबीचं हे रॉकेट चार मैल प्रति सेकंद इतक्या वेगानं खाली येतंय. याचे तुकडे कुठेही पडून स्फोट (Blast) होऊ शकतो. 29 एप्रिलला चीननं Long March 5B लाँच केलं होतं. याच्या मदतीनं चीनअंतराळात नवीन स्पेस स्टेशन (New space station) तयार करणार होतं.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: