नवी दिल्ली, 08 मे : अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस (US Vice President Kamala Harris) यांनी कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा (Second Corona Wave) सामना करत असलेल्या भारताला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या महामारीच्या सुरुवातीलाच आम्ही भारताला मदत केली होती. पण, सध्या भारतातील स्थिती बिकट असून आता आणखीन मदत करण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत, असेही कमला हॅरिस म्हणाल्या.
कोरोना संक्रमणामुळे भारतात दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या धक्कादायक आणि मनाला वेदनादायी आहे. अनेक भारतीयांनी त्यांच्या प्रियजनांना गमावलं आहे, त्या सर्वांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, त्यांच्या वेदना मी समजू शकते. या बिकट परिस्थितीत आम्ही आमच्याकडून शक्य तेवढी मदत करू, असे त्या म्हणाल्या.
आम्ही यापूर्वीच भारताला रिफिलेबल ऑक्सिजन सिलेंडर दिले आहेत. आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरदेखील पाठवले आहेत. यासोबतच अमेरिकेने भारताला एन 95 मास्क तसेच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रेमेडिसवीरचे डोसही दिले आहेत. सध्याचं संकट पाहता आम्ही आणखी मदत करण्यासही तयार आहोत, असेही त्या म्हणाल्या.
On Monday, April 26th, President Joe Biden spoke with the Prime Minister (PM Narendra Modi) to offer our support. By Friday, April 30, military members of the United States and civilians were delivering relief on the ground: US Vice President Kamala Harris#COVID19 pic.twitter.com/gUiheBNdI9
— ANI (@ANI) May 7, 2021
भारत आणि इतर काही देशांना लसीकरण मोहिमेत मदत करण्यासाठी अमेरिकेत बनलेल्या लसी आणि औषधांचे स्वामित्व अधिकार खुले करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. भारत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये जगातील कोरोनाच्या सर्वाधिक कोविड केसेस आहेत. कोरोनाची पहिली साथ पसरली त्यावेळी आम्हाला रुग्णालयात खाटा कमी पडत होत्या, त्यावेळी भारताने मदत पाठवली होती. आज भारताला मदतीची गरज आहे त्यामुळे आम्ही ही मदत करण्यासाठी तत्पर आहोत, असेही त्या म्हणाल्या.
हे वाचा - नवराच नाही तर सासऱ्याच्या पायाखालचीही सरकली जमीन, नव्या नवरीचं कृत्य वाचून व्हाल हैराण
अमेरिकेच्या निर्णयाचा भारताला होणार फायदा
अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक लसीकरण मोहिमेला गती येण्याची शक्यता आहे. भारतासारख्या विकसनशील देशांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आता योग्य रॉयल्टी न देता कोरोनाची लस निर्मिती करता येऊ शकेल. तसेच अमेरिकेच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील कंपन्यांनाही आता कोवॅक्सिन या भारतीय स्वदेशी लसीचं उत्पादन करता येऊ शकणार आहे, असे सांगण्यात येत आहे. सर्व गोष्टी मिळून आल्यास लसींचे उत्पादन वाढेल आणि परिणामी कोरोना नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.