मराठी बातम्या /बातम्या /विदेश /चीन आता माउंट एव्हरेस्टच्या टोकावरही आखणार सेपरेशन लाइन! अट्टाहासाचं कारण वाचा

चीन आता माउंट एव्हरेस्टच्या टोकावरही आखणार सेपरेशन लाइन! अट्टाहासाचं कारण वाचा

Mount Everest: एव्हरेस्ट शिखर दोन बाजूंनी सर करता येतं. एक नेपाळच्या बाजूने आणि दुसरं चीनच्या बाजूने. चीन आपल्या गिर्यारोहकांसाठी Separation Line आखणार आहे.

Mount Everest: एव्हरेस्ट शिखर दोन बाजूंनी सर करता येतं. एक नेपाळच्या बाजूने आणि दुसरं चीनच्या बाजूने. चीन आपल्या गिर्यारोहकांसाठी Separation Line आखणार आहे.

Mount Everest: एव्हरेस्ट शिखर दोन बाजूंनी सर करता येतं. एक नेपाळच्या बाजूने आणि दुसरं चीनच्या बाजूने. चीन आपल्या गिर्यारोहकांसाठी Separation Line आखणार आहे.

    बीजिंग, 11 मे: ज्या चीनच्या वुहान प्रांतातातून कोरोनाव्हायरस (Coroanvirus) जगभर पसरला, तिथे आता जनजीवन सुखनैव सुरू आहे. या देशाने Covid-19 वर नियंत्रण मिळवल्याचं सांगण्यात येत आहे. जगभरात इतर ठिकाणांहून आता चीनमध्ये कोरोना पसरू नये म्हणून चिनी प्रशासन काळजी घेत आहे. त्यांना आपल्या नागरिकांची किती काळजी आहे ते ताज्या उदाहरणावरून दिसेल. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी चीन आता एव्हरेस्ट शिखरावरही (Mount Everest)गिर्यारोहकांसाठी सीमारेषा आखून देणार आहे.

    एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च ठिकाणही आता कोरोना संसर्गाच्या (Corona) धोक्याला अपवाद राहिलेलं नाही. एव्हरेस्ट शिखरावर चढाई करू इच्छिणाऱ्या गिर्यारोहकांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. एव्हरेस्ट शिखर दोन बाजूंनी सर करता येतं. एक नेपाळच्या बाजूने आणि दुसरं चीनच्या बाजूने.

    एव्हरेस्ट चढाईसाठी येणाऱ्या गिर्यारोहकांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण  वाढत आहे. नेपाळ (Nepal side of Mount Everest) बाजूच्या बेस कॅम्पवरचे (Base Camp) गिर्यारोहक आणि अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यातच या अनुषंगाने इशारा दिला होता. त्यामुळे नेपाळच्या बाजूने येणाऱ्या गिर्यारोहकांचा चीनच्या बाजूने (Chinese Side)चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांशी संपर्क येऊ न देण्यासाठी चीनने या शिखरावर 'सेपरेशन लाइन' (Separation Line) आखायचं ठरवलं आहे. याची अंमलबजावणी नेमकी कशी होणार याबद्दल मात्र अद्याप कल्पना देण्यात आलेली नाही. 'बीबीसी'ने या बद्दलचं वृत्त दिलं आहे.

    नेपाळ आणि चीनच्या (China) सीमेवर असलेल्या या शिखरावर दोन्ही देशांतून चढाई करता येते.

    कोरोना विषाणूच्या निर्मितीसाठी 6 वर्षापासून सुरू होता चीनचा प्लॅन? वाचा कारण

    हिमालयातलं हे बर्फाच्छादित शिखर म्हणजे पृथ्वीवरचं सर्वोच्च ठिकाण असून, तिथे एका वेळी फक्त सहा व्यक्तींना उभं राहण्याएवढीच जागा आहे. गिर्यारोहणाच्या ऐन हंगामात या शिखरावर चढाई करण्यासाठी गिर्यारोहकांना अक्षरशः रांग लावून थांबावं लागतं.

    नेपाळच्या पंतप्रधानांना मोठा झटका, स्वकीयांमुळेच अविश्वास ठरावात खाल्ली आपटी

    तिथे येणाऱ्या गिर्यारोहकांचा एकमेकांशी संपर्क होऊन कोरोना संसर्ग पसरू नये, म्हणून चीनने सेपरेशन लाइनचा निर्णय घेतला आहे. गिर्यारोहण या विषयातल्या तिबेटी गाइड्सना चीनने त्यासाठी शिखरावर पाठवलं आहे. चिनी गिर्यारोहकांच्या चढाईपूर्वी ते सेपरेशन लाइनचं काम पूर्ण करतील; मात्र या निर्बंधांचं पालन होतंय की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी हे गाइड्स तिथेच राहणार आहेत की नाही, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.

    तिबेटच्या स्पोर्ट्स ब्यूरोच्या संचालकांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून चढाई केलेल्या गिर्यारोहकांचा परस्परांशी संपर्क केवळ शिखरावर गेल्यानंतरच येऊ शकतो.

    त्यामुळे सीमा रेषा आखून चिनी गिर्यारोहकांना नेपाळ बाजूने चढाई केलेल्या गिर्यारोहकांशी संपर्क साधता येणार नाही, अशी सोय केली जाणार आहे. तसंच, शिखरावर ठेवण्यात आलेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्याची परवानगीही त्यांना असणार नाही.

    सध्या चीनच्या बेसकॅम्पवर परमिट नसलेल्या पर्यटकांना प्रवेश दिला जात नाहीये. तसंच,चीनने यंदा परदेशी नागरिकांना एव्हरेस्टवर चढाई करण्याची परवानगी नाकारली आहे.

    दुसरीकडे, नेपाळने मात्र यंदाच्या हंगामात आतापर्यंत 400 जणांना शिखरावर जाण्याची परवानगी दिली आहे. नेपाळची अर्थव्यवस्था प्रामुख्याने एव्हरेस्ट मोहिमांवर अवलंबून आहे.

    Coronavirus Second Wave: भारताच्या कठीण काळात आम्ही सोबत; अमेरिकेनं दिलं मदतीचं आश्वासन

    गेल्या काही आठवड्यांत नेपाळच्या बाजूने 30 हून अधिक गिर्यारोहकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. काही जणांना हवाईमार्गे काठमांडूतही नेण्यात आल्याचं हिमालयन रेस्क्यू असोसिएशनने बीबीसीला सांगितलं.

    गेल्या तीन आठवड्यांत नेपाळमध्ये चाचणीकेलेल्या दर पाचपैकी दोघांना कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न होत असल्याचंएएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत 3,94,667 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 3720 जणांचा मृत्यू झाला आहे.

    First published:

    Tags: China, Coronavirus, Mount Everest, Nepal