मराठी बातम्या /बातम्या /देश /नेपाळच्या पंतप्रधानांना मोठा झटका, स्वकीयांमुळेच अविश्वास ठरावात खाल्ली आपटी

नेपाळच्या पंतप्रधानांना मोठा झटका, स्वकीयांमुळेच अविश्वास ठरावात खाल्ली आपटी

275 सदस्य असलेल्या सभागृहात पंतप्रधान ओली (Nepal K. P. Sharma Oli) बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले. कारण त्यांच्याच पक्षातल्या काही सदस्यांनी केलेली एक कृती.

275 सदस्य असलेल्या सभागृहात पंतप्रधान ओली (Nepal K. P. Sharma Oli) बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले. कारण त्यांच्याच पक्षातल्या काही सदस्यांनी केलेली एक कृती.

275 सदस्य असलेल्या सभागृहात पंतप्रधान ओली (Nepal K. P. Sharma Oli) बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले. कारण त्यांच्याच पक्षातल्या काही सदस्यांनी केलेली एक कृती.

नवी दिल्ली, 10 मे : नेपाळचे (Nepal) पंतप्रधान के पी शर्मा ओली (K. P. Sharma Oli) सोमवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बहुमत सादर करण्यात अपयशी ठरले आहेत. पुष्पकमल दहल 'प्रचंड' मोडीत नीत नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने (माओवादी केंद्र) सरकारचे समर्थन काढून घेतल्यानंतर त्यांना कनिष्ठ सभागृहात बहुमत सादर करायचे होते. यासाठी सोमवारी संसदेचे विशेष सत्र बोलावण्यात आले.

275 सदस्य असलेल्या सभागृहात पंतप्रधान ओली (K. P. Sharma Oli) बहुमत जिंकण्यात अपयशी ठरले. खरंतर फ्लोर टेस्टच्या अगोदरच ओली यांना मोठा झटका बसला होता. कारण त्यांच्याच पक्षातील काही सदस्य सोमवारच्या विशेष सत्रामध्ये सहभागी झाले नव्हते.

पक्षातील वीस बंडखोर सदस्यांनी विशेष सत्रावर बहिष्कार घालण्याचे ठरवले होते. त्यामुळे पंतप्रधानांना आपल्याच पक्षातील काही सदस्यांचा पाठिंबा मिळणार नसल्याचे समजले होते. आदल्या दिवशी पंतप्रधानांनी या बंडखोर गटाला घाईगडबडीत कोणताही निर्णय न घेण्याचे आवाहन केले होते, असे पक्षाचे नेते भीम रावल म्हणाले.

हे वाचा - आता प्लाझ्मा डोनर शोधणं होणार सोपं; Snapdeal ने लाँच केलं खास अ‍ॅप, अशी होईल मदत

पक्षातीलच बंडखोर गट आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ या पक्षातील सदस्यांना पंतप्रधान ओली यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी व्यवस्थित विचार करा. आपण सर्व एकत्र बसून कोणत्याही विषयावर तोडगा काढू, असे आवाहन केले होते. मात्र त्याचा फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे.

हे वाचा - ‘मला 2 आई असल्याचा गर्व होता पण…’, कोरोनाने आई-बहीण हिरावल्यानंतर क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीची भावुक पोस्ट

ओली यांना फेब्रुवारी 2018 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर) या पक्षाच्या समर्थनामुळे पंतप्रधानपदी विराजमान होता आले होते. या पक्षाचे अध्यक्ष पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड हे आहेत. मात्र मार्च मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पार्टीचे विलगीकरण रद्द करण्यात आले होते. दोन माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ आणि झलनाथ खनाल पक्षामध्ये फूट पाडण्याचे काम करत होते.

First published:
top videos

    Tags: Nepal, Political party