• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • हुश्श! जगासमोरील एक संकट तरी टळलं, हिंदी महासागरात कोसळले चीनच्या 'त्या' रॉकेटचे अवशेष

हुश्श! जगासमोरील एक संकट तरी टळलं, हिंदी महासागरात कोसळले चीनच्या 'त्या' रॉकेटचे अवशेष

चीनच्या अनियंत्रित रॉकेटचं (China's Out of Control Rocket) संकट आता दूर झालं आहे. मीडिया अहवालानुसार त्या रॉकेटचे अवशेष हिंदी महासागरात कोसळले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 मे: चीनच्या अनियंत्रित रॉकेटचं (China's Out of Control Rocket) संकट आता दूर झालं आहे. मीडिया अहवालानुसार त्या रॉकेटचे अवशेष हिंदी महासागरात कोसळले आहेत. चीनं लाँग मार्च 5बी हे रॉकेट गेले काही दिवस जगासमोरील डोकेदुखी ठरत होतं. अवकाशात झेप घेतलेल्या या रॉकेटवरील चीनचं नियंत्रण सुटल्याने ते धरतीच्या दिशेने वेगाने येत होतं. दरम्यान ते कुठे आदळेल याची खात्री नव्हती. जर लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी हे रॉकेट आदळलं असतं तर मोठी हानी झाली असती मात्र आता हे संकट तरी दूर झाल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. चिनी माध्यमांच्या माहितीनुसार, लॉंग मार्च 5 बी रॉकेटचे काही अवशेषांनी बीजिंगच्या वेळेनुसार सकाळी 10:24 वाजता वातावरणात प्रवेश केला आणि ते एकाच जागी पडले. पडलेल्या रॉकेटचे जे अवशेष पडले आहेत, ते 72.47 डिग्री पूर्वेकडे आणि अक्षांश 2.65 डिग्री उत्तरेकडे स्थित आहेत. याचा प्रभाव बिंदू भारत आणि श्रीलंकेच्या दक्षिण-पश्चिमेला समुद्रात दाखवण्यात येत आहे. या रॉकेटचा अधिकांश अवशेष वातावरणात जळून गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित अवशेष मालदीवजवळ समुद्रात पडताना आढळून आले आहेत. हे वाचा-भारतीयांचं कौतुक करणं इम्रान खानला पडलं महागात; पाकिस्तानींना राग अनावर चीनमधून अवकाशात पाठविलेले हे मोठे रॉकेट अनियंत्रित झाल्याची माहिती मिळाल्याने खगोलशास्त्रज्ञांना हे रॉकेट कुठे पडेल याची चिंता लागून राहिली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच असा दावा केला होता की, या रॉकेटचा कचरा कोणत्याही प्रकारचं नुकसान करणार नाही.  पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्याचा बहुतेक भाग जळून जाईल. 29 एप्रिलला चीननं 'लाँग मार्च 5 बी' (Long March 5B ) नावाचं रॉकेट (rocket) लाँच केलं होतं. तज्ज्ञांच्या मते हे रॉकेट चीनच्या नियंत्रणाबाहेर गेलं होतं आणि ते त्याठिकाणी फुटलं होतं. मीडिया अहवालानुसार या रॉकेटची लांबी 100 फूट होती. या रॉकेटचं नियंत्रण सुटण्याआधी त्याने पृथ्वीभोवती 30 हून अधिक प्रदक्षिणा मारल्या आहेत. एका तासात 28000 मैल अंतर पार करणाऱ्या या रॉकेटचं वजन 21 टन आहे. हे वाचा-काबुल हादरलं! शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा 50 वर; लहान मुलंही ठार काय होता चीनचा प्लॅन? या रॉकेटच्या मदतीनं चीन अंतराळात Tiangong (टियानगाँग) नावाचं स्पेस स्टेशन तयार करणार होता. 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता. हे स्टेशन पृथ्वीभोवती फेऱ्या मारून अंतराळातील माहिती चीनला पाठवणार होतं. मात्र, आता रॉकेटचं फुटल्यानं चीनचा प्लॅन फसला आहे. फुटलेलं रॉकेट पृथ्वीवर पडून नुकसान होण्याच्या शक्यते बाबत चीनलाही कल्पना आहे. मात्र, अद्याप त्यांनी याची माहिती जाहीर केलेली नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे रॉकेट फुटल्यानंतर न्यूयॉर्क (New York), माद्रिद (Madrid), बीजिंग (Beijing), चिली (Chile) आणि न्युझीलंडच्या (New Zealand) काही भागांत हे अवशेष पडतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: