मराठी बातम्या /बातम्या /विदेश /काबुल हादरलं! शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा 50 वर; लहान मुलांचाही समावेश

काबुल हादरलं! शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा 50 वर; लहान मुलांचाही समावेश

शनिवारी काबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट (Afghanistan Blast) घडला. एका शाळेजवळ हा स्फोट करण्यात आला असून आतापर्यंत 50 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या भयंकर कृत्याद्वारे लहान शाळकरी मुलांना लक्ष्य केले गेले आहे, ही बाब सर्वांत गंभीर आहे.

शनिवारी काबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट (Afghanistan Blast) घडला. एका शाळेजवळ हा स्फोट करण्यात आला असून आतापर्यंत 50 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या भयंकर कृत्याद्वारे लहान शाळकरी मुलांना लक्ष्य केले गेले आहे, ही बाब सर्वांत गंभीर आहे.

शनिवारी काबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट (Afghanistan Blast) घडला. एका शाळेजवळ हा स्फोट करण्यात आला असून आतापर्यंत 50 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या भयंकर कृत्याद्वारे लहान शाळकरी मुलांना लक्ष्य केले गेले आहे, ही बाब सर्वांत गंभीर आहे.

पुढे वाचा ...

काबुल, 09 मे: अफगाणिस्तानात  हिंसाचार सुरूच आहे. निरपराध लोकांचे बळी जातच आहेत. शनिवारी काबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट (Afghanistan Blast) घडला. एका शाळेजवळ हा स्फोट करण्यात आला असून आतापर्यंत 50 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. या भयंकर कृत्याद्वारे लहान शाळकरी मुलांना लक्ष्य केले गेले आहे, ही बाब सर्वांत गंभीर आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

काबुलमध्ये बॉम्बस्फोट, 50 ठार

हा स्फोट सय्यद-उल-शुहादा हायस्कूलजवळ घडल्याची माहिती मिळाली आहे. या शाळेत मुले आणि मुली दोघेही शिकतात मात्र त्यांची वेळ वेगवेगळी असते. ही शाळा तीन शिफ्टमध्ये काम करते आणि विद्यार्थीनींना दुसऱ्या शिफ्टमध्ये शिकवले जाते. हा हल्ला नेमका याच वेळी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये बर्‍याच मुलींचा समावेश आहे.

आज तकच्या वृत्तानुसार काही स्थानिक लोकांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी एका नव्हे तर, तीन स्फोटांचा आवाज ऐकला आहे. आत्तापर्यंत प्रशासनाने याची खातरजमा केलेली नाही. परंतु बरेच लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मद अली जीना रुग्णालयामध्ये सर्वांवर उपचार सुरू आहेत.

हल्ल्यानंतरपासून या परिसरात मोठा गोंधळ माजला आहे. येथील स्थानिकांचा रूग्णवाहिका चालक संस्थेपासून ते प्रशासनापर्यंत रोष पसरला आहे. काबुलच्या त्याच पश्चिम भागात गेल्या वर्षीही असे बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी येथे एका रुग्णालयाला लक्ष्य केले गेले होते, जेथे गर्भवती महिलांसह अनेक नवजात बालकांचा मृत्यू झाला. आता लोक त्या घटनेतून सावरू लागले होते. तोपर्यंत शाळेजवळ दुसरा स्फोट झाला.

मृतदेहांनी भरलेली रुग्णालये, वेदनादायक छायाचित्रे

अनेक लोक रुग्णालयाबाहेर दिसत आहेत, जे पीडितांना मदत करू इच्छित आहेत. कोणी रक्तदान करण्यास तयार आहेत. तर, कोणी आणखी काही मदत करू इच्छित आहेत. आपात्कालीन परिस्थितीत प्रत्येकजण एकवटलेला दिसत आहे. मात्र, घटनास्थळावरील स्थितीने आणि येथील छायाचित्रांनी सर्वांना हादरवले आहे. रक्ताने भिजलेली दप्तरे, पुस्तके जमिनीवर पडलेली आहेत. तर, एका इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. एपीच्या एका पत्रकाराने सांगितले की, त्यांनी एकाच वेळी 20 मृतदेह रुग्णालयात पडलेले असल्याचे पाहिले आहेत. येथेच जखमींवर उपचारही सुरू आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, आता अफगाण सरकारनेही लोकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

हे वाचा - भारतीयांचं कौतुक करणं इम्रान खानला पडलं महागात; पाकिस्तानींना राग अनावर

आतापर्यंत या भ्याड हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही. पण अनेक अंदाज बांधले जात आहेत. एकीकडे अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे आयएसशी संधान बांधले गेले असून दोघांचे मिळून हे कारस्थान सुरू आहे, असा दावा तालिबान्यांनी केला आहे. तर, दुसरीकडे सरकारकडून याविषयी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तालिबानच्या प्रवक्त्याने या हल्ल्याचा निषेध केला आहे. परंतु, त्याचबरोबर आयएस आणि अफगाणिस्तानच्या इंटेलिजेंस एजन्सीवरही आरोप केले आहेत.

हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही

मागील काही काळापासून अफगाणिस्तानात आयएसची एक शाखा किंवा संलग्न संघटना खूप सक्रिय झाली आहे. या संघटनेद्वारे शिया मुस्लिमांना सतत लक्ष्य केले जात आहे. असे अनेक हल्ले झाले आहेत, ज्यात स्वतः आयएसने जबाबदारी स्वीकारली आहे. या प्रकरणातही संशयाची सुई त्याच बाजूला जात आहे. परंतु, घटनेनंतर आयएसने कोणताही व्हिडिओ किंवा संदेश जारी केलेला नाही. अशा प्रकारच्या आरोपांवर अजूनही एकमेकांवर दोषारोप ठेवले जात आहेत. बर्‍याच निरपराध लोकांचे प्राण गमावलेले दिसत आहेत. या अपघातात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु ही संख्या आणखी वाढू शकते.

हे वाचा - Coronavirus: आरोग्य मंत्रालय तज्ज्ञांचा सल्ला ऐकायलाही तयार नाही; आता तरी जागे व्हा, IMA चा आरोप

तसेच, या हल्ल्याची आणखी एक बाजू देखील सांगितली जात आहे की, यावर्षी सप्टेंबरपर्यंत अमेरिका अफगाणिस्तानातून आपले सैन्य काढून घेणार आहे. अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या वतीने असे म्हटले आहे की, येत्या काळात सैन्य काढून घेतले जाईल, तेव्हा सरकारच्या विरोधात तालिबानकडून काही कारवाया केल्या जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तालिबान या हल्ल्यापासून स्वत:ला नक्कीच दूर ठेवत आहे. पण त्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

First published:

Tags: Afghanistan, Bomb Blast