मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अमेरिकेची झोप उडाली; चिनी सैनिकांना शक्तिशाली करण्यासाठी सरकारकडून जेनेटिक फेरफार

अमेरिकेची झोप उडाली; चिनी सैनिकांना शक्तिशाली करण्यासाठी सरकारकडून जेनेटिक फेरफार

चीन (China) आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचं उदाहरण ठरू शकेल, अशी एक गोष्ट उघड झाली आहे.

चीन (China) आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचं उदाहरण ठरू शकेल, अशी एक गोष्ट उघड झाली आहे.

चीन (China) आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचं उदाहरण ठरू शकेल, अशी एक गोष्ट उघड झाली आहे.

    बीजिंग, 10 जूलै : चीन (China) आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचं उदाहरण ठरू शकेल, अशी एक गोष्ट उघड झाली आहे. चीन आपल्या सैनिकांना अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी असं काम करतोय की ते ऐकून अमेरिकेचीही झोप उडेल. आपले सैनिक अधिक सक्षम व्हावेत यासाठी चीन गर्भवती महिलांची (Pregnant Women) जनुकीय माहिती (Genetic Data) चोरून अभ्यासत आहे. अमेरिकी सल्लागार समूहाने याबाबतची माहिती राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारला (Biden Government) दिली असून, सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकी सल्लागारांच्या म्हणण्यानुसार, भविष्यात जेनेटिक इंजिनीअरिंगच्या (Genetic Engineering) साह्याने चीन आपलं सैन्य अधिक बलशाली करू शकतो. ही बाब अमेरिकेसाठी धोकादायक ठरू शकते.

    या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, बीजीआय ग्रुप (BGI Group) या चिनी कंपनीने आतापर्यंत 80 लाख चिनी महिलांचा डेटा अनैतिक मार्गाने जमवला आहे. ही कंपनी चीनसह जगभरातल्या गर्भवती महिलांची प्रसूतिपूर्व तपासणी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. बाळामध्ये कोणाताही जनुकीय दोष नाही ना याची माहिती या तपासणीतून घेतली जाते. वृत्तातल्या दाव्यानुसार, ही तपासणी करण्याच्या बहाण्याने बीजीआय ग्रुपने मोठ्या संख्येने गर्भवती महिलांचा जनुकीय डेटा जमा केला आहे. या डेटामध्ये संबंधित महिलेचं वय, वजन, उंची आणि जन्म ठिकाण आदी माहिती आहे. या आधारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने (Artificial Intelligence) ते अशा मानवी गुणांचा शोध घेत आहेत, की ज्यामुळे भविष्यात जन्माला येणाऱ्या पिढीच्या शारिरिक गुणधर्मांमध्ये बदल केले जाऊ शकतात.

    हे ही वाचा-5 वी पासून विद्यार्थ्यांना मोफत कंडोम; 'या' शाळांच्या नव्या पॉलिसीमुळे गदारोळ

    अमेरिकी सरकारच्या सल्लागारांनी म्हटलं आहे, की मोठ्या प्रमाणात जनुकीय डेटा मिळवल्याने चीनला आर्थिक स्वरूपात, तसंच सैनिकी अशा दोन्ही प्रकारे लाभ होऊ शकतो. याद्वारे चीन आनुवंशिकदृष्ट्या प्रगत सैनिक विकसित करू शकेल. हे सैनिक असे असू शकतात, ज्यांना अधिक उंचावरच्या भागांत तैनात केलं तरी त्यांच्या ऐकण्याच्या आणि श्वासोच्छवासाच्या क्षमतेत काही फरक पडणार नाही. तसंच या डेटाच्या माध्यमातून चीन फार्मा क्षेत्रात जागतिक दबदबा निर्माण करू शकतो; अन्न पुरवठ्याला लक्ष्य करून अमेरिकेसमोर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण करू शकतो, असं अमेरिकी सल्लागारांना वाटतं.

    हे ही वाचा-अमेरिकेत सत्तापालटाच्या चर्चा; ऑगस्टमध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार ट्रम्प?

    चीन ज्या कथित पद्धतीने सैन्याची निर्मिती करण्यासाठी काम करत आहे, त्यावर आधारित एका हॉलिवूडपटाची निर्मिती 1998 मध्ये करण्यात आली होती. सोल्जर (Soldier) नावाच्या त्या सायन्स फिक्शनमध्ये अद्वितीय जनुक अभियांत्रिकीद्वारे अत्यंत घातक क्षमतेचं सैन्य तयार करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटात दाखवण्यात आलेले सैनिक अधिक शक्तिशाली होते. तेच आता चीन प्रत्यक्ष रूपात करत आहे, असं म्हणायला वाव आहे.

    First published:

    Tags: America, Army, China