मराठी बातम्या /बातम्या /विदेश /पाचवीपासून विद्यार्थ्यांना मोफत कंडोम; 'या' शाळांच्या नव्या पॉलिसीमुळे मोठा गदारोळ

पाचवीपासून विद्यार्थ्यांना मोफत कंडोम; 'या' शाळांच्या नव्या पॉलिसीमुळे मोठा गदारोळ

पालकांकडून शाळेच्या या नव्या पॉलिसीवर तीव्र टीका केली जात आहे. याबाबत शाळांचं म्हणणं आहे की,...

पालकांकडून शाळेच्या या नव्या पॉलिसीवर तीव्र टीका केली जात आहे. याबाबत शाळांचं म्हणणं आहे की,...

पालकांकडून शाळेच्या या नव्या पॉलिसीवर तीव्र टीका केली जात आहे. याबाबत शाळांचं म्हणणं आहे की,...

वॉशिंग्टन, 10 जुलै : अमेरिकेतील शिकागो शहरातील शाळांमध्ये (Schools in Chicago, USA) जारी केलेल्या एका आदेशानंतर आता सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. लोकांनी या निर्णयावर राग व्यक्त केला जात आहे. नव्या पॉलिसीनुसार (New school policy) पाचवीच्या वरील विद्यार्थ्यांना शाळेकडूनच कंडोमची व्यवस्था करून द्यावी लागेल. म्हणजे 10 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कंडोमची व्यवस्था (Condom arrangements for students up to 10 years) करून देण्याची जबाबदारी शाळेची असेल. या आदेशानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लोक याला लज्जास्पद आणि विकृत मानसिकता असल्याचं मानत आहेत.

शिकागो पब्लिक स्कूल बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या नव्या पॉलिसीअंतर्गत शाळांना पाचवी व त्यावरील वर्गाच्या मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करावी लागणार आहे. यामागे त्यांनी सांगितलं की, कंडोमच्या वापरामुळे मुलांमध्ये लैंगिक संक्रमणामुळे होणारे आजार, एचआयव्ही इन्फेक्शन आणि अनपेक्षित प्रेग्नेन्सी रोखण्यात मदत मिळेल. ही पॉलिसी डिसेंबर 2020 मध्ये तयार करण्यात आली होती. मात्र कोरोना महासाथीमुळे शाळा बंद असल्याकारणाने याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. शिकागोमध्ये पुढील महिन्यापासून शाळा सुरू होणार आहेत.

हे ही वाचा-इंग्लंडला चिअर करायला स्टेडियमवर गेली, TV वरही झळकली आणि त्यानंतर भलतच घडलं!

नव्या शाळेच्या पॉलिसीबाबत सोशल मीडियावर लोक आपला राग व्यक्त करीत आहेत. ही मानसिकता विकृत असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे तर अनेकांनी नव्या पॉलिसीविषयी सवाल उपस्थित केला आहे. एंड्र्यू पोलक नावाच्या एका ट्वीटर युजरने लिहिलं आहे की, 'शिकागो एलिमेंट्री शाळांमध्ये मोफत कंडोमची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलकच्या या ट्वीटवर लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि नव्या शाळेच्या पॉलिसीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे आणि राग प्रकट केला आहे.

First published:

Tags: School, United States of America, USA