Home /News /videsh /

अमेरिकेत सत्तापालटाच्या चर्चा; ऑगस्ट महिन्यात पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार डोनाल्ड ट्रम्प?

अमेरिकेत सत्तापालटाच्या चर्चा; ऑगस्ट महिन्यात पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार डोनाल्ड ट्रम्प?

अमेरिकेत राजकीय सत्तापालट होणार आहे आणि ऑगस्ट 2021 म्हणजे पुढच्याच्या पुढच्या महिन्यात अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump).

नवी दिल्ली 29 जून: अमेरिका या जगातील जुन्या आणि मोठ्या लोकशाही देशामध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेत राजकीय सत्तापालट होणार आहे आणि ऑगस्ट 2021 म्हणजे पुढच्याच्या पुढच्या महिन्यात अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump). हे वाचून काय वाटलं? तुम्हाला कदाचित वाटलं असेल बातमी लिहिताना चूक झाली असावी. पण चूक झालेली नाही सध्या अमेरिकेत या चर्चेला उधाण आलं आहे. विविध माध्यमांतून असं जनमानसासमोर मांडलं जातंय की ऑगस्ट 2021 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Ex-President of USA) ट्रम्प पुन्हा एकदा सत्ता हातात घेतील. काय आहे या मागचं तथ्य ते आपण या बातमीत जाणून घेणार आहोत. 2019 मध्ये झालेल्या अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन (President Joe Biden) यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जानेवारी 2021 ला बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अमेरिकेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो. पण आता बायडन यांच्या कार्यकाळाला पाच महिने पूर्ण होत आलेत आणि लगेच सत्तापालटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील ही अफवा पसरल्यामुळे अमेरिकेचा होमलँड सिक्युरिटी विभाग म्हणजेच गृह मंत्रालय सतर्क झालं आहे. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसात होणार मोठा बदल अमेरिकी वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार ऑगस्टमध्ये ट्रम्प यांना सत्तेत आणलं जाणार आहे, अशी चर्चा सर्वत्र असून सिडनी पॉवेल आणि ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनी ही चर्चा सुरू केली आहे. या चर्चेमागे काहीतरी कारस्थान असावं अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. एका वकीलावर खटला चालवला जात आहे. या वकिलाने व्हेनेझुएलामधले कम्युनिस्ट नेते, ऑपरेटर्स यांच्या मदतीने मतदान यंत्रांमध्ये फेरफार करून ट्रम्प यांना धोका दिला होता, असे आरोप या वकीलावर आहेत. ऑगस्ट महिन्यात ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील, असा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्का विश्वास आहे. पण कोणत्या आधारावर ते हा दावा करत आहेत आणि तो सत्यात कसा येणार याबद्दल काही स्पष्टता नाही, असं न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार मॅगी हॅबरमॅन यांचं मत आहे. काँग्रेसच्या खासगी संवादामध्ये काउंटर इंटेलिजन्सचे सर्वोच्च अधिकारी जॉन कोहेन यांना ऑगस्ट महिन्यातल्या संभाव्य सत्तांतरराबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते असंही काही वृत्तांत म्हटलं आहे. कोहेन यांनी सांगितलं होतं की जाणीवपूर्वक ट्रम्प यांच्याशी निवडणूक मतमोजणीदरम्यान धोका झाल्याची अफवा पसरवली गेली. जेणेकरून त्यांचे राजकीय समर्थक आक्रमक व्हावेत. Google ने भारतात लाँच केलं Job Search App, नोकरी शोधण्यासाठी होईल मदत द इंडिपेंडंटला दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकेतील होमलँड सिक्युरिटी विभागाच्या (DHS) प्रवक्त्याने सांगितलं होतं की, हिंसा आणि अतिरेकी विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या तसंच चिथावणीखोर व खोटी माहिती पसरवणाऱ्या गटांच्या हालचालींवर होमलँड सिक्युरिटी विभाग नजर ठेवून आहे. सोशल मीडिया व इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या मदतीने पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टी, चुकीचा प्रचार, कटकारस्थानांचं सिद्धांत आणि अतिरेकी मानसिकतेचा सामना करण्यासाठी आपली यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न सीएचएस करत आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Donald Trump, International, Joe biden, United States of America, USA

पुढील बातम्या