न्यूयॉर्क, 26 डिसेंबर: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना या पदावरून पायउतार होण्यासाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. 20 जानेवारी रोजी जो बायडेन (Joe Biden) यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली की डोनाल्ड ट्रम्प हे माजी अध्यक्ष होतील. त्या आधी ट्रम्प यांनी गंभीर गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना माफी देण्याचं सत्र सुरू केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष (US President) दुसऱ्यांबरोबर स्वतःलाही माफ (presidential pardoning power) करू शकतात, असं ट्वीट दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. अर्थात मी काहीही चूक केलेली नाही, त्यामुळं मला याचा फायदा नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या ट्वीटवर (Tweet) विशेष चर्चाही झाली होती. ट्रम्प यांना व्यवसायात आर्थिक अडचणी आल्याची चर्चाही सुरू झाली होती.
As has been stated by numerous legal scholars, I have the absolute right to PARDON myself, but why would I do that when I have done nothing wrong? In the meantime, the never ending Witch Hunt, led by 13 very Angry and Conflicted Democrats (& others) continues into the mid-terms!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) June 4, 2018
काय आहे हा आधिकार?
प्रत्येक अमेरिकन अध्यक्ष आपला कार्यकाल समाप्त होण्याआधी अनेक काम पूर्ण करतो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करतात ते म्हणजे माफी देण्याचं. याला पार्डन (Pardon) असं म्हणतात. या अधिकाराखाली एखाद्या व्यक्तीला किंवा समुहाला देखील माफी देण्याचा अधिकार आहे. गुन्हेगार तुरुंगात असेल आणि त्याचं वर्तन चांगलं असेल तर त्याला शिक्षा माफ करणं किंवा शिक्षेत सवलत देण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. अमेरिकेच्या अध्यक्षांशिवाय हा अधिकार राज्यांच्या गव्हर्नरनादेखील (Governor) असतो, अर्थात त्यांच्या अधिकारांना मर्यादा आहे. अमेरिकी राज्यघटनेनं (U.S. Constitution) अमेरिकेच्या अध्यक्षांना हा माफी देण्याचा अधिकार दिला असून त्यात काही अटीही आहेत.
ट्रम्प कुणालाही माफी देऊ शकतात का?
अध्यक्ष केवळ राष्ट्राशी संबधित गुन्ह्यांमध्ये हा अधिकार वापरू शकतात. राज्य विशेष संबधित गुन्हा असेल तर ट्रम्प या अधिकाराचा वापर करू शकत नाहीत. त्याबाबत त्या राज्याचे गव्हर्नर निर्णय घेऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या राज्याच्या करासंदर्भात काही गुन्हा घडला असला तर, त्यात अध्यक्ष हस्तक्षेप करू शकत नाही. त्याबाबत त्या राज्याचे गव्हर्नरच निर्णय घेतील. याचप्रमाणे सिव्हिल लीगल प्रकरणांबाबतही निर्णय देण्याचा अध्यक्षांना अधिकार नाही.
(हे वाचा-चीनचं पाप जगासमोर येणार, अमेरिका करणार मुस्लीम अत्याचाराची चौकशी!)
याशिवाय प्री पार्डन (Pre-Pardon)अशीही संज्ञा असून या आधारे ज्यांच्यावर अजून कायदेशीर कारवाई सुरू झालेली नाही, मात्र जे संशयित आहेत, त्यांना माफी दिली जाऊ शकते. ट्रम्प आपली मुलगी आणि जावई यांना प्री पार्डन अधिकाराखाली माफी देऊ शकतात, असं म्हटलं जात होतं. ट्रम्प यांची मुलगी आणि जावई तीन आर्थिक घोटाळ्यामध्ये अडकल्याच्या चर्चा होत्या. अर्थात ट्रम्प यांनी या अधिकाराचा वापर केलेला नाही.
(हे वाचा-COVID-19 चिंता वाढवणारी बातमी, Pfizer नंतर आणखी एका लशीमळे अॅलर्जी)
2001मध्ये तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अशा अनेक गुन्हेगारांना माफी दिली होती. ज्यामध्ये ड्रग्ज प्रकरणात दोषी असलेल्या रॉजर या सावत्र भावाचाही समावेश होता. एखादा गुन्हा राज्य आणि फेडरल या दोघांच्याही कक्षेत येत असेल तर, त्यातील गुन्हेगाराला अध्यक्ष केवळ फेडरलनं दिलेल्या शिक्षेत सवलत देऊ शकतात, राज्य त्या गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकते. अध्यक्ष स्वतःवर चाललेली कोणत्याही राज्यातील कारवाई थांबवू शकत नाहीत. सध्या ट्रम्प यांची न्यूयॉर्कमध्ये कर आणि आर्थिक घोटाळ्यांशी संबधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
खरंतर अमेरिकेचे अध्यक्ष स्वतःला माफी देऊ शकतात का या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. कारण आतापर्यंत अमेरिकेच्या इतिहासत असं कधी झालेलं नाही आणि घटनेतही असा वेगळा काही उल्लेख नाही. तज्ज्ञ मंडळी नेहमी या अधिकाराबाबत चर्चा करतात; पण अद्याप प्रत्यक्ष अशी वेळ कधीच उद्भवली नाही किंवा कायदेशीर पेचप्रसंगही आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Donald Trump, Joe biden, US President