वॉशिंग्टन, 26 डिसेंबर: जगभरात आता नुकताच कोरोनाच्या नव्या स्टेनमुळे दहशत निर्माण झाली आहे. भारतात देखील ब्रिटन, इंग्लंड आणि युरोपीय देशांमधून आलेल्या प्रवाशांची देखील तपासणी केली जात आहे. कोरोनाची लस भारतीय नागरिकांना कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना मोठी बातमी समोर येत आहे. Pfizer नंतर आता आणखीन एका लशीमुळे अॅलर्जी झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी मॉडर्ना लस घेतल्यानंतर बोस्टनमधील डॉक्टरला अॅलर्जी झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. या डॉक्टरला आधीपासूनच 'शेलफिश अॅलर्जी' असल्याची देखील चर्चा होत आहे.
बोस्टन मेडिकल सेंटरच्या जेरियाट्रिक ऑन्कोलॉजी विभागात डॉक्टर हुसेन सदरजादेह म्हणाले की ही लस घेतल्यानंतर त्यांना चक्कर व हृदय धडधड जाणवू लागली. अमेरिकेत मॉडर्नाच्या लशीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अशा पद्धतीनं अॅलर्जी येण्याची ही पहिलीच घटना असल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे आता मॉडर्ना लशीबाबत देखील चिंता व्यक्त केली जात आहे.
हे वाचा- Coronavirus बरोबर आता ब्लॅक फंगसचं सावट; मृत्यूदर वाढला
Coronavirus ची लस टोचून घेतलेल्यांना आता त्याचे साइड इफेक्ट्स दिसू लागले आहेत. विशेषतः अमेरिकेत ज्यांनी फायझरची लस घेतली आहे. त्यातल्या काहींना त्याची अॅलर्जी दिसायला लागले आहेत. त्यामुळे लशीचे वैज्ञानिक आणि डॉक्टरांची चिंता वाढली आहे. जगभरात आता कोरोना लशीकरणाबाबत संशयाचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे.
मेड इन इंडिया कोरोना लस कोवॅक्सिनचा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल जारी करण्यात आला. यामध्ये लस परिणाकारक आणि सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता या लशीला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळवण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी दुसऱ्यांदा अर्ज करण्यात आला आहे.