मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनचं पाप जगासमोर येणार, अमेरिका करणार मुस्लीम अत्याचाराची चौकशी!

चीनचं पाप जगासमोर येणार, अमेरिका करणार मुस्लीम अत्याचाराची चौकशी!

चीनमधील उइगर मुस्लिमांच्या (Uyghur Muslims) छळाचा सविस्तर रिपोर्ट अमेरिका तयार करणार आहे.चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत असल्याच्या बातम्या सतत येत असतात.

चीनमधील उइगर मुस्लिमांच्या (Uyghur Muslims) छळाचा सविस्तर रिपोर्ट अमेरिका तयार करणार आहे.चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत असल्याच्या बातम्या सतत येत असतात.

चीनमधील उइगर मुस्लिमांच्या (Uyghur Muslims) छळाचा सविस्तर रिपोर्ट अमेरिका तयार करणार आहे.चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत असल्याच्या बातम्या सतत येत असतात.

  वॉशिंग्टन, 26 डिसेंबर: भारत–चीन सीमेवर (India – China Border) तणाव कायम असतानाच अमेरिकेनं चीनला दणका देण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. चीनमधील उइगर मुस्लिमांच्या (Uyghur Muslims) छळाचा सविस्तर रिपोर्ट अमेरिका तयार करणार आहे. चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत असल्याच्या बातम्या सतत येत असतात. आता अमेरिकेच्या चौकशीनंतर चीनची ही सर्व पापं एका रिपोर्टमधून जगासमोर येणार आहेत. अमेरिकन माध्यमांनी याबाबत दिलेल्या वृत्तानुसार परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ (Mike Pompeo) यांनी जागतिक गुन्हेगारी न्याय राजदूत मोर्सरे टॅन यांना याची जबाबदारी सोपवली आहे. टॅन यांना नियोजित वेळात उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराचा रिपोर्ट तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्राचा ठपका संयुक्त राष्ट्राच्या (UN) नियमांनुसार लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींची मोठ्या प्रमाणात हत्या करणे हा नरसंहार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार, किमान दहा लाख मुस्लिमांना चीनच्या शिनझियांग (Xinxiang) प्रांतातल्या छावण्यांमध्ये डांबून ठेवलं आहे. या छावण्यांमध्ये त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत असल्याचा चीनचा दावा असला, तरी प्रत्यक्षात त्या या धार्मिक अल्पसंख्याकांच्या छळछावण्या आहेत. (हे वाचा-पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम, शेतकरी संघटनांची आज मोठी बैठक?) यापूर्वी शिनजियांगमधील अतुश सुंथग गावात एक मशिदीला (Tokul mosque torn down) सार्वजनिक शौचालय बनविण्यात आले होते. तसेच गावातील अनेक मशिदी देखील पाडण्यात आल्या होत्या. अमेरिकेनंही सातत्यानं या प्रकरणात चीनवर मानवाधिरकाराचा भंग (Human Rights Violations) केल्याचा ठपका चीनवर ठेवला आहे. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या बाबतच्या एका विधेयकाला काही महिन्यांपूर्वी मान्यता दिली होती. या विधेयकानंतर कारवाईचा पुढचा भाग म्हणून अमेरिका या प्रकरणाती चौकशी करणार आहे. (हे वाचा-पत्नी आणि चार मुलांची धारदार शस्त्राने हत्या करून तरूणानं स्वतःलाही संपवलं) चीनमध्ये 2003 साली झालेल्या जनगणनेत उइगरांची लोकसंख्या तब्बल 90 लाखांच्या जवळ होती. तर अनाधिकृत अंदाजानुसार ही संख्या यापेक्षाही जास्त आहे. उइगर हा चीनमधील 55 अल्पसंख्यक समुदायांपैकी पाचव्या क्रमांकाचा समुदाय आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: China

  पुढील बातम्या