मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

टिपू सुलतानाच्या सिंहासनावरची व्याघ्रमुख सापडली, ब्रिटन करणार लिलाव

टिपू सुलतानाच्या सिंहासनावरची व्याघ्रमुख सापडली, ब्रिटन करणार लिलाव

 एक तर लुटून आणलेल्या मौल्यवान आणि वारसा असलेल्या वस्तूची विक्री करायची आणि दुसरीकडे आपल्या देशाबाहेरच्या कोणी ती विकत घेऊ नये म्हणून निर्यातबंदी करायची'

एक तर लुटून आणलेल्या मौल्यवान आणि वारसा असलेल्या वस्तूची विक्री करायची आणि दुसरीकडे आपल्या देशाबाहेरच्या कोणी ती विकत घेऊ नये म्हणून निर्यातबंदी करायची'

एक तर लुटून आणलेल्या मौल्यवान आणि वारसा असलेल्या वस्तूची विक्री करायची आणि दुसरीकडे आपल्या देशाबाहेरच्या कोणी ती विकत घेऊ नये म्हणून निर्यातबंदी करायची'

    मुंबई, 17 नोव्हेंबर : अमूल्य वस्तूंची किंमत ठरवता येऊ शकत नाही, असं म्हटलं जातं; ब्रिटनचं सरकार मात्र हे खोटं ठरवत आहे. ब्रिटन सरकारच्या डिजिटल, कल्चर, मीडिया अँड स्पोर्ट्स विभागाकडून एका अमूल्य वस्तूचा लिलाव केला जाणार आहे. ही अमूल्य वस्तू म्हणजे टायगर ऑफ म्हैसूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिपू सुलतानाच्या (Tipu Sultan) सिंहासनावरचं व्याघ्रमुख होय. सिंहासनावरचं हे व्याघ्रमुख ब्रिटिशांनी (British) भारतातून लुटून नेलेल्या संपत्तीपैकी एक आहे. या व्याघ्रमुखाची किंमत 1.5 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे 14 कोटी 98 लाख 64 हजार 994 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. हे व्याघ्रमुख ब्रिटनबाहेरच्या कोणा व्यक्तीने विकत घेऊ नये म्हणून त्यावर तात्पुरती निर्यातबंदी लागू करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने 12 नोव्हेंबर रोजी घेतला आहे. ब्रिटन सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे. एक तर लुटून आणलेल्या मौल्यवान आणि वारसा असलेल्या वस्तूची विक्री करायची आणि दुसरीकडे आपल्या देशाबाहेरच्या कोणी ती विकत घेऊ नये म्हणून निर्यातबंदी करायची, हा दुटप्पीपणा असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. कॅप्टन्सी सोडली, टीम इंडियातलं स्थानही गेलं, द्रविडच्या शिष्याचं धमाक्यात कमबॅक! कला आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या वस्तूंच्या निर्यातीबद्दलचा आढावा घेणाऱ्या समितीच्या (RCEWA) शिफारशीनंतर ब्रिटनचे कलाविषयक मंत्री लॉर्ड स्टीफन पार्किन्सन यांनी व्याघ्रमुखाच्या (Throne Finial) तात्पुरत्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी 11 फेब्रुवारी 2022पर्यंत असून, या व्याघ्रमुखाच्या निर्धारित किमतीत खरेदीसाठी निधी उभारण्याकरिता कोणी गांभीर्याने प्रयत्न करत असल्याचं दिसल्यास या निर्यातबंदीला 11 जून 2022पर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते. टिपू सुलतानाच्या सिंहासनावरचं हे व्याघ्रमुख म्हणजे 18व्या शतकाच्या अखेरीच्या वर्षांतल्या अँग्लो-इंडियन इतिहासातली (Anglo Indian History) एक महत्त्वाची प्रातिनिधिक वस्तू असल्याचं RCEWA ने म्हटलं आहे. 1799 साली टिपू सुलतान लढाईत मारला गेला आणि त्याचा पराभव झाला. त्या वेळी ब्रिटिश सैन्याच्या प्राइझ एजंट्सनी श्रीरंगपटण या त्याच्या राजधानीतलं टिपू सुलतानाचं रत्नजडित अष्टकोनी सुवर्णसिंहासन तोडलं. त्यावर सोन्याची आठ व्याघ्रमुखं होती. त्यापैकी चारच व्याघ्रमुखं शिल्लक आहेत, असं RCEWA चे सदस्य ख्रिस्तोफर रॉवेल यांनी सांगितलं. शिल्लक असलेल्या त्या चार व्याघ्रमुखांपैकी एका व्याघ्रमुखाचा आता लिलाव केला जात असून, एक व्याघ्रमुख पॉविस कॅसलमधल्या क्लाइव्ह म्युझियममध्ये आहे. हे व्याघ्रमुख आणि सिंहासनाचे अन्य अवशेष ब्रिटनमध्येच राहावेत, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असं रॉवेल यांनी सांगितलं. गडचिरोलीत आणखी एका जहाल माओवाद्याचा मृतदेह सापडला, 51 गुन्हे होते दाखल प्रत्येक सुवर्ण व्याघ्रमुखावर वेगवेगळ्या प्रकारचे किमती खडे आहेत. त्याचं डिझाइन एकमेवाद्वितीय आहे. टिपू सुलतानाकडे कार्यरत असलेले सोनार किती कुशल होते, याची साक्ष हे व्याघ्रमुख देतं, असं रॉवेल यांनी सांगितलं. या सिंहासनावरचं मोठ्या आकाराचं सोन्याचं रॉक क्रिस्टल व्याघ्रमुख आणि त्यावर कोरलेला हुमा पक्षी ब्रिटनचा जॉर्ज तिसरा आणि राणी शार्लोट यांना देण्यात आलं होतं. टिपू सुलतान मारला जाईपर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी तो खूप मोठा धोका ठरत होता. वाघ हे टिपू सुलतानाचं व्यक्तिमत्त्व दर्शवणारं चिन्ह होतं. '1000 वर्षं मेंढी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगणं श्रेयस्कर,' हे टिपू सुलतानाचं वाक्य प्रसिद्ध आहे. नेपोलियनच्या फ्रान्ससोबत जवळीक साधल्याने टिपू सुलतानाचा ब्रिटिशांकडून पाडाव झाला, असं रॉवेल यांनी सांगितलं. ही घटना ब्रिटनच्या इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जाते. त्याच्या पाडावानंतर टिपूच्या खजिन्यातल्या अनेक वस्तू ब्रिटनमध्ये नेल्या गेल्या. त्या पाहून जॉन कीट्ससारखा कवी, चार्ल्स डिकन्स, विल्की कोलिन्स यांसारखे फिक्शन लेखक, जे. एम. डब्ल्यू टर्नर यांच्यासारखे कलाकार यांच्यावर बराच प्रभाव पडला. तिथल्या सर्वसामान्य नागरिकांमध्येही त्याबद्दल बरंच आकर्षण आहे. अशा तऱ्हेचं हे सुवर्ण व्याघ्रमुख देशाबाहेर गेलं, तर ते दुर्दैव असेल. कारण ते देशाच्या इतिहासाशी निगडित आहे. 18 व्या शतकातला अँग्लो इंडियन इतिहास, राजेशाही आदींच्या अभ्यासाच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे, अशी भूमिका घेऊन RCEWA ने निर्यातबंदीची शिफारस मंत्र्यांकडे केली आणि मंत्र्यांनी त्याची दखल घेऊन अंमलबजावणी केली. सावधान! परदेशातून सोनं आणताना जाणून घ्या सीमा शुल्क विभागाचे नियम; अन्यथा... ब्रिटन सरकारच्या डिजिटल, कल्चर, मीडिया अँड स्पोर्ट्स विभागाकडून या व्याघ्रमुखाचं दर्शन घडवणारा एक छोटा व्हिडिओ ट्विट करण्यात आला असून, त्यात निर्यातबंदीमागची कारणं देण्यात आली आहेत. हा मौल्यवान ठेवा देशाबाहेर जाऊ न देण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. या ट्विटवर अनेकांनी टीका केली असून, लुटून नेलेल्या वस्तूचा लिलाव करणं आणि त्यातही ती वस्तू जिथून लुटली, त्या देशातल्या कोणालाही ती खरेदी करता येऊ नये म्हणून त्यावर निर्यातबंदी लागू करणं, हा दुटप्पीपणा असल्याची टीका होत आहे. तसंच, हे भारतीय इतिहासाशी निगडित असून, ब्रिटिश इतिहासाशी संबंधित असल्याचा दावा कसा काय केला जातो, असंही काही जणांनी म्हटलं आहे.
    First published:

    पुढील बातम्या