मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पहिले कॅप्टन्सी सोडली, टीम इंडियातलं स्थानही गेलं, द्रविडच्या शिष्याचं धमाक्यात कमबॅक!

पहिले कॅप्टन्सी सोडली, टीम इंडियातलं स्थानही गेलं, द्रविडच्या शिष्याचं धमाक्यात कमबॅक!

मोहम्मद अझरुद्दीन आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर केरळने हिमाचल प्रदेशचा (Kerala vs Himachal Pradesh) पराभव करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Sayed Mushtaq Ali Trophy) क्वार्टर फायनलमध्ये स्थान पटकावलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 नोव्हेंबर : मोहम्मद अझरुद्दीन आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर केरळने हिमाचल प्रदेशचा (Kerala vs Himachal Pradesh) पराभव करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Sayed Mushtaq Ali Trophy) क्वार्टर फायनलमध्ये स्थान पटकावलं आहे. 146 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केरळच्या अझरुद्दीनने 60 रन आणि कर्णधार संजू सॅमसनने नाबाद 52 रनची खेळी केली. केरळने हे आव्हान तीन बॉल शिल्लक असताना पार केलं. आयपीएलमध्ये संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सची कॅप्टन्सी सोडल्याचं वृत्त आलं होतं, तसंच त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठीही टीम इंडियात निवड झाली नव्हती.

संजू सॅमसनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली आहे. 6 इनिंगमध्ये त्याने 114 च्या सरासरीने 227 रन केले आहेत, यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 144 चा आहे. स्पर्धेच्या 4 इनिंगमध्ये तो नाबाद राहिला, त्यामुळे त्याने टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी दंड थोपटले आहेत.

हिमाचलचा ओपनर राघव धवनने 52 बॉलमध्ये 65 रन केले, तरीही त्यांना 6 विकेट गमावून 145 रनपर्यंतच मजल मारता आली. धवनशिवाय प्रशांत चोप्राने 36 रन केले.

क्वार्टर फायनलमध्ये आता केरळचा सामना 18 नोव्हेंबरला तामीळनाडूशी होणार आहे. अंतिम-8 मुकाबल्यांमध्ये बंगाल विरुद्ध कर्नाटक, राजस्थान विरुद्ध विदर्भ, गुजरात विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना रंगेल. सेमी फायनल 20 नोव्हेंबरला आणि फायनल 22 नोव्हेंबरला खेळवली जाईल. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तन्मय अग्रवालने सर्वाधिक 302 रन केले आहेत.

आयपीएलचा लिलाव पुढच्या एक-दोन महिन्यात होणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार आहे. तसंच तो सीएसके टीमशी जोडला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएलच्या पुढच्या मोसमात 8 ऐवजी 10 टीम खेळणार आहेत. एवढच नाही तर मॅचची संख्याही 60 ऐवजी 74 होईल, असं असलं तरी प्रत्येक टीम 14 मॅचच खेळणार आहे.

First published:

Tags: Sanju samson