कोलकाता, 29 एप्रिल : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप लस शोधता आलेली नाही आहे. अनेक देशांमध्ये कोरोनावर लस आणि उपचार शोधण्यासाठी दिवस रात्र शास्त्रज्ञ मेहनत करत आहेत. यात अनेक देशांतील नामांकित विद्यापीठेही संशोधनात गुंतलेली आहेत. असेच एक संशोधन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमने केलं आहे. कोरोना लस बनविण्याच्या प्रयत्नात असलेल्या वैज्ञानिकांच्या पथकात एका भारतीयचादेखील समावेश आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एक महिला ऑक्सफर्डकडून ही लस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. ऑक्सफर्डमध्ये राहणाराऱ्या 34 वर्षीय चंद्र दत्ता युनिव्हर्सिटी फॅसिलिटी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अॅंटी व्हायरल वेक्टर वॅक्सीन ChAdOx1 nCoV-19 तयार करण्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. मागील आठवड्यातच विद्यापीठानं मानवावर या लसीची चाचणी सुरू केली आहे. वाचा- दारूची दुकाने बंद का? एम्सच्या डॉक्टरांनी काय सांगितलंय, ते एकदा वाचाच! आई-वडिलांना आहे अभिमान चंद्राचे 65 वर्षीय वडील समीर कांती आणि 58 वर्षीय आई काबेरी दत्ता कोलकातामधील गोल्फ गार्डन परिसरात राहतात. त्यांनी आमच्या एकुलत्या एका मुलीवर गर्व असल्याचे सांगितले. कोरोनावर लस मिळवण्यासाठी गेले काही दिवस रात्रंदिवस चंद्रा काम करत आहे. मात्र आई-वडिलांना चिंताही आहे. चंद्राची आई काबेरी म्हणाल्या, “माझी मुलगी नेहमीच महत्वाकांक्षी आणि बुद्धिमान होती. कोरोनोव्हायरस ज्या प्रकारे पसरत आहे त्याबद्दल मला खूप काळजी वाटते”. ब्रिटनमध्ये कोरोना संक्रमित प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. वाचा- आधी झाला कोरोना मग हृदय पडलं निकामी, मृत रुग्णाची अवस्था पाहून डॉक्टर झाले हैराण
गेल्या वर्षी आली होती भारतात चंद्रानं आपल्या गोखले मेमोरियल गर्ल्स स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले आणि हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीटेक केले. 2009मध्ये मध्ये लीड्स विद्यापीठात बायोसायन्स विषयात एमएससी करण्यासाठी ती ब्रिटनला गेली. गेल्या वर्षी ऑक्सफर्ड येथे नोकरी करण्यापूर्वी चंद्रानं बर्याच ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदार पदावर काम केले. सध्या ती विद्यापीठातील सिने-बायो-मॅन्युफॅक्चरिंग सुविधेत कार्यरत आहे, ही सुविधाजगभरातील प्रारंभिक टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी व्हायरल वेक्टर लस तयार करते. दरम्यान चंद्राच्या वडिलांनी गेल्या डिसेंबरमध्ये ती घरी आली होती आणि काही आठवड्यांपर्यंत होती, असे सांगितले. वाचा- इतक्या दिवसांचा असावा लॉकडाऊन, आनंद महिंद्रा यांनी सरकारला दिला सल्ला कोरोनाची सर्वात मोठी चाचणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या चाचणीत यश मिळण्याचं प्रमाण 80 टक्के इतकं असल्याचं सांगितलं होतं. इंग्लंड सरकारने यासाठी 20 मिलियन पौंडांची तरतूद केली आहे. इंग्लंडच्या आरोग्य सचिवांनी सांगितंल की, सरकार कोरोनाला रोखणारी लस शोधण्यासाठी जे करता येईल ते करण्यास तयार आहे. ब्रिटनमध्ये 165 रुग्णालयात तब्बल 5 हजार रुग्णांवर एक महिन्यापर्यंत आणि अशाच पद्धतीने युरोप आणि अमेरिकेतील शेकडो लोकांवर या लसीचे परीक्षण होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर पीटर हॉर्बी यांनी सांगितलं की, ही जगातील सर्वात मोठी चाचणी आहे. पीटर हॉर्बी हे याआधी इबोलाच्या औषधाची ट्रायल घेणाऱ्या टीमचे नेतृत्व करत होते. दरम्यान, ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी दावा केला आहे की, दोन वॅक्सिन यावेळेला सर्वात पुढे आहेत. एक ऑक्सफर्डमध्ये आणि दुसरी इम्पिरियल कॉलेजमध्ये तयार केली जात आहे. संपादन-प्रियांका गावडे