एक दोन नाही तर त्यानं तब्बल 6 वेळा जिंकली लॉटरी, मुलीच्या शिक्षणासाठी राखून ठेवला सर्व पैसा

एक दोन नाही तर त्यानं तब्बल 6 वेळा जिंकली लॉटरी, मुलीच्या शिक्षणासाठी राखून ठेवला सर्व पैसा

गुरुवारी एका क्रॉसवर्ड स्क्रॅच गेममधून या व्यक्तीने 25,0000 डॉलर्सचे रोख पारितोषिक जिंकले आहे. पूर्वी, त्याने आयडाहो लॉटरीमधून पाच वेळा बक्षिसे जिंकली आहेत.

  • Share this:

मेरिडियन, 03 फेब्रुवारी: एखाद्या माणसाला एकाच प्रकारची लॉटरी (Lottery) एक दोन वेळा नव्हे तर तब्बल सहा वेळा लागली आहे, असं कुणी सांगितलं तर ते खरं वाटेल का? नाही ना... पण हे सत्य आहे. मेरिडियन (Meridian) इथं राहणारा ब्रायन मॉस (Brian Moss) हा तो भाग्यवान माणूस आहे ज्याला तब्बल सहा वेळा लॉटरी लागली आहे. या वेळी तर त्याला जॅकपॉट (Jackpot) लागला असून, तब्बल अडीच लाख डॉलर्स मिळाले आहेत.

प्रत्येक सामान्य माणूस आपल्या आर्थिक चिंता दूर व्हाव्यात, डिझाइनर ब्रँडसची खरेदी करता यावी किंवा जगाची सफर करता यावी यासाठी एक मोठी लॉटरी किंवा जॅकपॉट लागण्याचं स्वप्न कायम पाहत असतो; पण फार कमी लोकांचं हे स्वप्न पूर्ण होतं. अशाच काही मोजक्या भाग्यवान लोकांपैकी एक ब्रायन मॉस आहे. गुरुवारी एका क्रॉसवर्ड स्क्रॅच गेममधून (Crossword Scratch Game) त्यानं 2 लाख 50 हजार डॉलर्सचं रोख पारितोषिक जिंकलं. ही त्यानं जिंकलेली सहावी लॉटरी असून, यावेळी त्यानं आतापर्यंतची सर्वांत मोठी रक्कम मिळवली आहे. यापूर्वी त्यानं आयडाहो लॉटरीमधून पाच वेळा बक्षिसे जिंकली आहेत. बक्षिसाच्या या अवाढव्य रकमेतून तो अनेक महागड्या गोष्टी घेऊ शकतो; पण ब्रायननं ही सगळी रक्कम आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी राखून ठेवली आहे. ब्रायन मॉस मेरिडीयनमध्ये न्युको स्पोर्ट आणि न्युट्रीशन हेल्थ स्टोअर चालवतो.

(हे वाचा-Gold Price Today: सुवर्णसंधी! कस्टम ड्यूटी घटल्यानंतर इतके कमी झाले सोन्याचे दर)

आयडाहो लॉटरीनं (Idaho Lottery) ब्रायनला विजेता घोषित करताना काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘ब्रायन मॉस नियमितपणे आयडाहो लॉटरी खेळतो कारण यामुळे आयडाहो शाळांना फायदा होतो, याची त्याला जाणीव आहे.’ आयडाहो लॉटरीच्या माध्यमातून सार्वजनिक शाळांना पाठबळ देता येतं त्यामुळं मी ही लॉटरी खेळतो, असं मॉसनं म्हटल्याचंही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. त्यानं लॉटरी लागलेल्या तिकिटासह आपला फोटोही फेसबुकपेजवर टाकला आहे.

आयडाहो लॉटरीवरील लाभांश राज्यातील सार्वजनिक शाळा आणि आयडाहोची महाविद्यालयं आणि विद्यापीठं यासाठीच्या कायमस्वरुपी इमारत निधीला दिला जातो. या राज्य लॉटरीच्या आतापर्यंतच्या इतिहासात या दोन प्रकारच्या संस्थांना 961.5 दशलक्ष डॉलर्सचं योगदान देण्यात आलं आहे.

(हे वाचा - Tax Free Country! 'या' देशांमधील नागरिकांना भरावा लागत नाही कोणत्याही प्रकारचा टॅक्स, तुम्हीही व्हाल चकित)

दरम्यान, अलीकडेच झालेल्या बदलांनुसार, आता भारतीय अमेरिकतील द मेगा मिलियन्स आणि पॉवरबॉल लॉटरी अशा विविध ऑनलाइन लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकतात. आत्तापर्यंत, अमेरिकेत गेल्यांनतर मेगा मिलियन्स आणि पॉवरबॉल लॉटरीची तिकीटे भारतीयांना विकत घेता येत असत आता ते ऑनलाइन भाग घेऊ शकतात. या दोन्ही लॉटरी तब्बल 1.58 अब्ज डॉलर्सचा जॅकपॉट देत आहेत. आता ही लॉटरी खेळण्यासाठी अमेरिकन नागरिक किंवा रहिवासी असणे आवश्यक नाही.

भारतात सध्या केवळ आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, केरळ, महाराष्ट्र, मेघालय, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोरम, नागालँड, पंजाब, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या 13 राज्यांमध्येच लॉटरीला परवानगी आहे. अन्य राज्यांमध्ये लॉटरीला कायदेशीर परवानगी नाही. जुगाराबद्दल प्रत्येक राज्याचे तिथल्या स्थानिक जनतेची पसंती आणि इतिहासावर अवलंबून असे स्वतःचे कायदे आहेत. 1967 मध्ये स्थापन झालेली केरळ राज्य लॉटरी ही पहिली राज्यस्तरीय लॉटरी होती. त्यानंतर या राज्यातील सर्व खासगी किंवा विना परवाना लॉटरींवर कडक बंदी घातली गेली.

Published by: Aditya Thube
First published: February 3, 2021, 10:02 PM IST

ताज्या बातम्या