जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! कस्टम ड्यूटी घटल्यानंतर इतके कमी झाले दर

Gold Price Today: सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! कस्टम ड्यूटी घटल्यानंतर इतके कमी झाले दर

Gold Price Today: सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! कस्टम ड्यूटी घटल्यानंतर इतके कमी झाले दर

Gold Silver Price on 2nd February 2021: अर्थसंकल्पामध्ये सोन्याचांदीवर कस्टम ड्यूटी घटवल्यानंतर (gold silver custom duty cut) सोन्याचांदीच्या किंमतीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी: अर्थसंकल्पामध्ये सोन्याचांदीवर कस्टम ड्यूटी घटवल्यानंतर (gold silver custom duty cut) सोन्याचांदीच्या किंमतीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण तर चांदीच्या दरामध्ये वाढ झाली होती. आज मंगळवारी देखील सोन्याने घसरणीनेच सुरुवात झाली आहे. आज सोन्याचे दर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे भाव 0.6 टक्क्याने घसरून 48,438 रुपये प्रति तोळा झाली आहे. चांदीचे दर याशिवाय चांदीच्या दरातही 2.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सिल्ह्वर फ्यूचरची किंमत 72,009 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचली आहे. एमसीएक्सवर चांदीची वायदे किंमत 1614.00 रुपयांनी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरले सोन्याचांदीचे दर याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर, आज याठिकाणी सोन्याचांदीचे दर घसरले आहेत. अमेरिकेत सोन्यामध्ये 3.10 डॉलरची घसरण झाली आहे. यानंतर सोन्याचे दर 1,856.34 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. चांदीमध्ये 0.28 डॉलरची घसरण होऊन दर 28.42 डॉलरच्या स्तरावर ट्रेड करत आहेत. (हे वाचा- LPG गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी द्या फक्त एक मिस्ड कॉल, आताच सेव्ह करा हा नंबर ) सोन्याचांदीवर 5 टक्क्याने घटवली इंपोर्ट ड्यूटी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात असे जाहीर केले की, सोन्याचांदीवरील आयात शुल्क (import tax) घटवण्यात येत आहे. सोन्याचांदीवरील आयात शुल्क 5 टक्क्याने घटवले आहे. सध्या सोन्याचांदीवर 12.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागत आहे, या कपातीच्या निर्णयानंतर केवळ 7.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागेल. यामुळे आणखी काही प्रमाणात सोन्याचांदीचे दर कमी होण्याची शक्यता आहे. (हे वाचा- याठिकाणी गुंतवणूकदारांची सोन्यापेक्षा चांदीला पसंती! चांदीने गाठला उच्चांक) मोदी सरकार देतंय स्वस्त सोने खरेदीची संधी मोदी सरकारकडून (Modi Government) पुन्हा एकदा स्वस्त सोनेखरेदी करण्याची सुवर्णसंधी (Buy Gold with Modi Govt scheme) मिळणार आहे. सरकारद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडचे सब्सक्रिप्शन (Soverign Gold Bond) आजपासून (1 फेब्रुवारी) ते 5 फेब्रुवारी दरम्यान लागू करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावेळी गोल्ड सब्सक्रिप्शनची किंमत 4,912 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. गोल्ड बाँडच्या माध्यमातून सोनेखरेदी करण्याची (Sovereign Gold Bond Scheme 2020-21 Series XI) ही अकरावी संधी आहे. गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकदारांना सोने फिजिकल स्वरूपात मिळत नाही, मात्र फिजिकल गोल्डपेक्षा ही गुंकवणूक सुरक्षित मानली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात