ब्राझीलिया, 25 मार्च : कोरोना व्हायरसच्या विळख्यात सारं जग आहे. तब्बल 175 देशांना कोरोनाची लागण झाली आहे. 18 हजार लोकांना आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळं जगातील अनेक देशांमध्ये लॉक डाऊन घोषित करण्यात आला. कोरोनाला संसर्ग रोखण्यासाठी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले जात असताना, लोकं मात्र घराबाहेर पडत आहे. अशाच लोकांना इंगा दाखवण्यासाठी पोलिसांनी थेट हेलिकॉप्टर आणलं. हा प्रकार ब्राझीलमध्ये घडला. ब्राझीलमध्येही कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. देशात 2 हजार 201 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं ब्राझीलमध्येही लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. तरी लोक समुद्रकिनाऱ्यावर मज्जा करण्यासाठी बाहेर पडत आहे. अशाच लोकांना पळवण्यासाठी ब्राझिलियन पोलिसांनी समुद्रकिनारी हेलिकॉप्टर उडवून वाळूचे वादळ तयार केले. फ्लोरियानो पोलिस गॅल्हेटा बीचवर लोकांवर वाळूचे कण उडवण्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन आले. वाचा- VIDEO : दोस्त दोस्त ना रहा! पोलिसांचा दंडूका पडताच पाहा काय केलं वाचा- ‘पप्पा नका जाऊ…बाहेर कोरोना आहे’ म्हणत पोलिसाच्या मुलाने फोडला हंबरडा, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणवतील पोलिसांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, कोरोनामध्येही लोक समुद्रकिनारी गर्दी करत आहेत. त्यामुळं आम्हाला हा मार्ग अवलंबवावा लागला. हे केल्यानंतर बरेच लोक पळून गेले. सांता कॅटरिना सरकारने 17 मार्च रोजी आणीबाणी घोषित केली आणि लोकांना मोठ्या गटांत जमण्यास मनाई केली आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. वाचा- पोलीस आईनं पोटच्या लेकीला करोनाच्या भीतीनं वलंठे अडीचशे किलोमीटर दूर कोरोनाचा मृत्यू दर झाला कमी चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या विषाणूनचे जगातील तब्बल 175 देशांना विळखा घातला. प्रत्येक देश कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना करत आहे. यामुळं सध्या जवळजवळ संपर्ण जग लॉक डाऊन झाले आहे. जगभरात कोरोनामुळे 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 175 देशांमध्ये 4 लाख 22 हजार 829 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. मात्र असे असले तरी जगभरात जवळ जवळ 1 लाख 09 हजार 102 लोकं निरोगी झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.