पोलीस आईनं पोटच्या लेकीला करोनाच्या भीतीनं ठेवलं अडीचशे किलोमीटर दूर

पोलीस आईनं पोटच्या लेकीला करोनाच्या भीतीनं ठेवलं अडीचशे किलोमीटर दूर

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या गेल्या अडीच वर्षांपासून हिंजवडी पोलीस ठाण्यात काम करत आहेत.

  • Share this:

पिंपरा-चिंचवड, 25 मार्च : सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनाव्हायरस या आजाराने थैमान घातलं आहे. अशात कोणीही घराबाहेर पडणार नाही असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. याच पार्श्वभूमिवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांना घरात बसणं शक्य नाही. पोलिसांनी २४ तास आपलं काम करावं लागतं. लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांना बाहेर राहणं महत्त्वाचं आहे. एका पोलीस महिलेचा एक असा अनुभव समोर आला आहे जे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी येईल.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या गेल्या अडीच वर्षांपासून हिंजवडी पोलीस ठाण्यात काम करत आहेत. पुण्यातही करोनानं थैमान घातलं असून या भीतीने त्यांनी आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला स्वतः पासून वेगळं ठेवलं आहे. त्यांनी त्यांच्या मुलीला अडीचशे किलोमीटर दूर आजोळी ठेवलं आहे.

कविता यांनी एका वृत्तपत्राला यासंबंधी माहिती दिली आहे. इशा असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. आपल्यामुळे मुलीली त्रास होऊ नये म्हणून त्यांनी तिला आजोळी पाठवलं. इतकंच नाही तर तिला तिकडे करमावं म्हणून त्यांनी पतीलाही तिच्यासोबत गावी पाठवलं आहे. अशात त्या एकट्या पिंपरीमध्ये कामानिमित्त राहतात. पिंपरीत कोरोनाचे 12 रुग्ण आहेत.

कविता यांनी सांगितलं की त्या मुलीला जवळ घेऊ शकत नाहीत म्हणून त्या रोज तिला व्हिडिओ कॉल करतात. देशातल्या या सगळ्या स्थितीमुळे घरचे नोकरी सोड असंही म्हणतात असं कविता यांनी सांगितलं. खरंतर त्यांच्या या अनुभवामुळे अंगावर शहारे येतात. त्यामुळे या जीवघेण्या कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकानं घरात थांबा आणि सुरक्षित राहा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

First published: March 25, 2020, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading