Home /News /viral /

VIDEO : दोस्त दोस्त ना रहा! पोलिसांचा दंडूका पडताच पाहा काय केलं

VIDEO : दोस्त दोस्त ना रहा! पोलिसांचा दंडूका पडताच पाहा काय केलं

मजा करत बाहेर फिरणाऱ्या दोन दोघांना दांडक्यानं चोप दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    मुंबई, 24 मार्च : कोरोना व्हायरसमुळे मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात 101 जणांना तर देशभरात 470 हून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देशभरातील 22 राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पंजाब आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याच लॉकडाऊनदरम्यान दोन मित्र बाईकवरून फिरायला बाहेर पडले. सरकारच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पोलिसांनी या दोघांना पकडलं. मजा करत बाहेर फिरणाऱ्या दोन दोघांना दांडक्यानं चोप दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दोन मित्र मजा करत दुचाकीवरून चालले होते. त्यांना पोलिसांनी अडवलं आणि कर्फ्यूदरम्यान फिरत असल्यानं दांडक्यानं फटकवलं. पोलिसांचा दांडका पडताच बाईकस्वारानं दुसऱ्या मित्राला रस्त्यातच टाकून पळ काढला. हा मित्र त्याला थांबण्यासाठी ओरडत असतानाच बाईकस्वारानं मागेही न बघता धूम ठोकली. सच्चा यार म्हणणाऱ्या मित्रानंच दगा पोलिसांचा दांडूका पडताच दगा दिला. देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जवळपास 22 हून अधिक राज्य आणि 80 हून अधिक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. हे वाचा-कहर! लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांचा पोलिसांनी केला 'मुर्गा', VIDEO VIRAL हे वाचा-कोरोनाच्या भीतीने त्यानं घेतलं डबल प्रोटेक्शन, VIDEO एकदा बघाच
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या