न्यूयॉर्क 19 ऑक्टोबर : बिल गेट्स यांची मोठी मुलगी जेनिफर गेट्सने बॉयफ्रेंड नेल नासरसोबत लग्न केलं (Bill Gates Daughter Gets Married) आहे. दोघंही 2017 पासून एकमेकांना डेट करत होते. नेल नासेर हा इजिप्शियन घोडेस्वार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी या दोघांनी अतिशय गुप्तपणे लग्नगाठ बांधली (Jennifer Gates Married to her Boyfriend).
सर्वसामान्यांनी जगायचं कसं? इंधन दरवाढीमुळे सणासुदीत भाज्यांचे भाव भिडले गगनाला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर गेट्स आणि नेल नासरचा विवाह सोहळा न्यूयॉर्कमधील नॉर्थ सालेममध्ये कुटुंबाच्या 142 एकर मालमत्तेत सुमारे 300 पाहुण्यांमध्ये झाला. या दरम्यान जेनिफर गेट्स कस्टम वेरा वँग फुल-स्लीव्ह गाऊनमध्ये दिसली. या गाउनवर बारीक भरतकाम पाहायला मिळालं. जेनिफर गेट्सला 8 ब्राईड मेट्सनं तयार केलं होते.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफर आणि नासरच्या पार्टीचा कार्यक्रम न्यूयॉर्कच्या नॉर्थ सेलममघ्ये 142 एकर हॉर्स फार्ममध्ये झाला. या पार्टीमध्ये २० लाख डॉलर म्हणजेच तब्बल १५ कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला (Jennifer Gates Wedding Cost). बिल गेट्स यांनी जेनिफरसोबत एल्टन जॉनच्या ‘कॅन यू फील द लव्ह टूनाइट’ गाण्यावर डान्स केला.
या राज्याचे CM आहेत सर्वात महाग,योगी आदित्यनाथ की उद्धव ठाकरे कुणाचा पगार जास्त?
यावेळी आपल्या घटस्फोटानंतर जवळपास 3 महिन्यांनी बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स एकत्र दिसले. बिल गेट्स गडद हिरव्या रंगाच्या सूटमध्ये तर मेलिंडा परपल रंगाच्या गाउनमध्ये दिसल्या. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचं रिसेप्शन शनिवारी ठेवण्यात आलं होतं. यात केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराला आमंत्रित करण्यात आलं होतं. अरबपती मायकल ब्लूमबर्ग यांची मुलगी जॉर्जिना ब्लूमबर्गही या रिसेप्शनमध्ये दिसली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bill gates, Wedding