मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सर्वसामान्यांनी जगायचं कसं? इंधन दरवाढीमुळे ऐन सणासुदीत भाज्यांचे भाव भिडले गगनाला

सर्वसामान्यांनी जगायचं कसं? इंधन दरवाढीमुळे ऐन सणासुदीत भाज्यांचे भाव भिडले गगनाला

इंधन दरात त्यातही डिझेलच्या (Diesel) किमतीत वाढ झाल्यानं वाहतुकीचा (Transportation) खर्च वाढला आहे.

इंधन दरात त्यातही डिझेलच्या (Diesel) किमतीत वाढ झाल्यानं वाहतुकीचा (Transportation) खर्च वाढला आहे.

इंधन दरात त्यातही डिझेलच्या (Diesel) किमतीत वाढ झाल्यानं वाहतुकीचा (Transportation) खर्च वाढला आहे.

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : इंधन दरात ( Fuel Price) सातत्यानं होत असलेली वाढ आणि कर्नाटक तसेच महाराष्ट्रात अतिवृष्टीनं (Heavy Rain) उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्याने सणासुदीच्या काळात कांदा (Onion), टोमॅटोचे (Tomato) दर वधारले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनेही प्रयत्न करूनही या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कांदा आणि टोमॅटोच्या दरात वाढ झाली असून, डाळी आणि खाद्यतेलाच्या (Edible Oil) सरासरी किमती गेल्या एक महिन्यापासून स्थिर आहेत.

`इकॉनॉमिक टाइम्स`ने दिलेल्या वृत्तानुसार, भाज्यांच्या घाऊक दरात 10 ते 15 रुपये प्रतिकिलोनं वाढ झालेली आहे. किरकोळ बाजारात हे दर 15 ते 20 रुपयांनी वधारले असून, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काळात उपभोग्य वस्तू आणखी महाग होऊ शकतात, असं भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितलं.

इंधन दरात त्यातही डिझेलच्या (Diesel) किमतीत वाढ झाल्यानं वाहतुकीचा (Transportation) खर्च वाढला आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. अपुरा पुरवठा (Supply) आणि वाढीव वाहतूक खर्चामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसत आहे, असं एका व्यापाऱ्यानं `इकोनॉमिक टाइम्स`शी बोलताना सांगितलं.

सरकारनं संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात कांद्याचा दर किलोला 28 रुपये होता. त्या तुलनेत रविवारी कांद्याचे सरासरी दर 39 रुपये झाला. एक वर्षापूर्वी कांद्याचे सरासरी दर 46 रुपये प्रतिकिलो दर होता. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या काही शहरांमध्ये रविवारी कांद्याचा दर 50 ते 65 रुपये प्रतिकिलो होता. त्याचप्रमाणे टोमॅटोच्या दरातही वाढ झाल्याचं दिसून आलं. रविवारी टोमॅटोचा दर 45 रुपये किलो होता. मागील महिन्यात सप्टेंबरमध्ये हेच दर 27 रुपये प्रतिकिलो तर मागील वर्षी याच कालावधीत हे दर 41 रुपये प्रतिकिलो होते.

सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटोचे दर हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं रविवारी ग्राहक व्यवहार मंत्रालयानं (Consumer Affairs Ministry) निवेदनाव्दारे स्पष्ट केलं. ऑगस्टपासून बफरमधून (Buffer) योग्य प्रमाणात आणि फर्स्ट इन-फर्स्ट आउट या तत्त्वानुसार कांदा आल्यानं त्याच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचं `टाइम्स ऑफ इंडिया`च्या वृत्तात म्हटलं आहे.

हे ही वाचा-Petrol-Diesel Price today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा आजचा लेटेस्ट रेट

नोव्हेंबरच्या मध्यात साठा कमी झाल्यानं आणि नवा माल बाजारात येऊ लागल्यानं सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान कांद्याच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. तथापि, ग्राहक व्यवहार मंत्रालयानं सांगितलं की ``यावर्षी बफर स्टॉकमधील कांदा मार्केटमध्ये येण्यास सुरवात झाली आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत दिल्ली, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई आणि चंदीगड आदी महत्त्वाच्या मार्केटमध्ये एकूण 67,357 टन कांदा आला आहे``.

या व्यतिरिक्त बी ग्रेड (B Grade) म्हणजेच सरासरी गुणवत्तेपेक्षा कमी दर्जाच्या कांद्याची महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील स्थानिक बाजारात विक्री होत आहे. आम्ही सर्व राज्यांना बफरमधील कांदा 21 रुपये किलो दराने साठवण ठिकाणांवरून उचलण्यास परवानगी दिल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.

First published:

Tags: Petro price hike, Vegetable