जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / बाबा वेंगा यांची भारताबद्दल भीतीदायक भविष्यवाणी, वाचा 2 महिन्यांनंतर काय घडणार?

बाबा वेंगा यांची भारताबद्दल भीतीदायक भविष्यवाणी, वाचा 2 महिन्यांनंतर काय घडणार?

बाबा वेंगा यांची भारताबद्दल भीतीदायक भविष्यवाणी, वाचा 2 महिन्यांनंतर काय घडणार?

बाबा वेंगा यांनी 2022 सालासाठी अनेक भयंकर भाकितं वर्तवली होती. त्यानंतर आता 2023 सालासाठी त्यांची भाकितं जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 31 ऑक्टोबर :  बल्गेरियातील बाबा वेंगा या भविष्य सांगणाऱ्या अंध महिलेने करून ठेवलेली भाकितं खरी होतात, असं म्हटलं जातं. बाबा वेंगा यांनी सन 5079 पर्यंत भाकितं करून ठेवली आहेत. सोव्हिएत युनियनचं विघटन, अल-कायदा या दहशतवादी संघटनेने 9/11ला अमेरिकेवर केलेला हल्ला यासह बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकितं आतापर्यंत खरी ठरली आहेत. बल्गेरियातील अंध बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीवर जगातील अनेकांचा विश्वास आहे. बाबा वेंगा यांनी 2022 सालासाठी अनेक भयंकर भाकितं वर्तवली होती. त्यानंतर आता 2023 सालासाठी त्यांनी कोणती भाकितं वर्तवली आहेत, हे जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. दरम्यान, आता बाबा वेंगा यांनी भारताबाबत केलेलं भाकितं लोकांच्या मनात भय निर्माण करत आहेत. चला जाणून घेऊया बाबा वेंगा यांनी 2023 सालासाठी भारताबद्दल काय भाकीत केलं आहे? या संदर्भात ‘अमर उजाला’ने वृत्त दिलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी भाकीत केलं आहे की 2023 मध्ये जगातील तापमान कमी होईल, ज्यामुळे टोळधाड येईल. अन्नाच्या शोधात टोळ भारतावर हल्ला करतील. यामुळे पिकांचं मोठं नुकसान होईल. परिणामी, भारतात दुष्काळाची परिस्थिती ओढवेल किंवा उपासमारीची परिस्थिती निर्माण होईल. बाबा वेंगा यांनी वर्तवलेलं हे भाकीत खरं ठरल्यास देशावर मोठं संकट येऊ शकतं. याआधी बाबा वेंगा यांची अनेक भाकितं खरी ठरली आहेत, त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं सावट आहे. बाबा वेंगाची भविष्यवाणी! 2023 वर्ष जगासाठी ठरणार अतिशय भयंकर, नेमकं काय घडणार? बाबा वेंगा यांची कोणती भाकितं ठरली खरी? बाबा वेंगा यांनी 2022 साठी वर्तवलेल्या भाकितांमध्ये काही देशांत पाणी टंचाई उद्भवेल, असं म्हटलं होतं. पोर्तुगाल आणि इटलीसारख्या देशांना त्यांनी पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला होता. 1950 च्या दशकानंतर या देशांमध्ये पाऊस कमी पडतोय, त्यामुळे इथे दुष्काळजन्य परिस्थितीचा नागरिकांना सामना करावा लागतोय. बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं, की या वर्षी आशियातील काही देश व ऑस्ट्रेलियामधील काही भागात पूर येईल. त्याशिवाय भूकंप व त्सुनामीचं भाकितही त्यांनी वर्तवलं होतं. त्यानुसार, या वर्षी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात हाहाकार माजला. बांगलादेश, भारताचा ईशान्येकडील प्रदेश आणि थायलंडमधील लोकांनाही पुराचा फटका बसला आहे. यावरून बाबा वेंगा यांचं हे भाकीतही खरं ठरलं होतं हे दिसतं. Halloween Party मधील दुर्घटनेत 149 जणांचा मृत्यू, श्वास कोंडल्याने आणि हार्ट अटॅकने घेतले शेकडो जीव कोण होत्या बाबा वेंगा? बल्गेरियातील बाबा वेंगा या दृष्टिहीन महिला साधू होत्या. 1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांची वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी दृष्टी गेली. त्यांनी वर्तवललेली अनेक भाकितं आतापर्यंत खरी ठरली आहेत. त्यांचे 85 टक्के अंदाज खरे ठरल्याचं सांगण्यात येतंय. ऑगस्ट 1996 मध्ये बाबा वेंगा यांचं स्तनाच्या कर्करोगाने निधन झालं. पण मृत्यूपूर्वीच त्यांनी 5079 सालापर्यंतची भाकितं सांगून ठेवली होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात