जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / बाबा वेंगाची भविष्यवाणी! 2023 वर्ष जगासाठी ठरणार अतिशय भयंकर, नेमकं काय घडणार?

बाबा वेंगाची भविष्यवाणी! 2023 वर्ष जगासाठी ठरणार अतिशय भयंकर, नेमकं काय घडणार?

बाबा वेंगाची भविष्यवाणी! 2023 वर्ष जगासाठी ठरणार अतिशय भयंकर, नेमकं काय घडणार?

बाबा वेंगा यांनी 2023 साठी केलेल्या भाकितांबद्दल बोलायचं झाल्यास हे वर्ष आपल्या पृथ्वीसाठी खूप धोकादायक ठरू शकतं. या वर्षात होणारी मोठी खगोलीय घटना पृथ्वीच्या कक्षा बदलून टाकेल.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 27 ऑक्टोबर : मूळच्या बल्गेरियातील बाबा वेंगा या भविष्य सांगणाऱ्या महिलेने मृत्यूआधी करून ठेवलेल्या भविष्यवाणींची अनेकदा चर्चा होते. आतापर्यंत त्यांनी केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. 2022 वर्षासाठी त्यांनी केलेल्या भाकितांपैकी दोन खरी ठरली आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही भाकितं त्यांनी अनेक दशकांआधी करून ठेवली होती. त्यामुळे आता 2022 वर्ष सरत असताना येणाऱ्या 2023 वर्षात कोणत्या गोष्टी घडतील, याबाबत जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे बाबा वेंगाने 2023 बद्दल करून ठेवलेल्या भविष्यवाणी ऐकण्याचे वेध लोकांना लागलेत. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. 2023 वर्ष पृथ्वीसाठी धोकादायक बाबा वेंगा यांनी 2023 साठी केलेल्या भाकितांबद्दल बोलायचं झाल्यास हे वर्ष आपल्या पृथ्वीसाठी खूप धोकादायक ठरू शकतं. या वर्षात होणारी मोठी खगोलीय घटना पृथ्वीच्या कक्षा बदलून टाकेल. पृथ्वीच्या भ्रमणातील या बदलाचे भयंकर परिणाम होऊ शकतात. पृथ्वीच्या कक्षेत बदल झाल्यास त्याचे परिणाम एखाद्या मोठ्या संकट किंवा आपत्तीसारखे असू शकतात. जगातल्या सगळ्यात अस्वच्छ माणसाने 50 वर्षांनी अंघोळ करताच गमावला जीव, नेमकं काय घडलं? शुक्र ग्रहावर पोहोचेल माणूस एवढंच नाही तर बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरल्यास माणूस 2028 मध्ये शुक्र ग्रहावर पोहोचेल. बाबा वेंगाचा अंदाज आहे, की अंतराळवीर 2028 मध्ये शुक्र ग्रहावर पोहोचतील. तसंच 2046 पर्यंत मानवाने एवढी प्रगती केली असेल की शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयव बदलता येईल आणि व्यक्ती 100 वर्षांहून अधिक जगण्यास सक्षम होईल. 5079 होईल जगाचा अंत बाबा वेंगा यांच्या भाकितांवर विश्वास ठेवायचा झाल्यास त्यांच्या मते 5079 साली जगाचा अंत होईल. याआधी बाबा वेंगाने अल कायदाने अमेरिकेवर केलेल्या 9/11 च्या हल्ल्यासंबंधी केलेलं भाकीत आणि इतर मोठी भाकितं आतापर्यंत खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियामध्ये झाला होता आणि वयाच्या 86 व्या वर्षी म्हणजेच 1996 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांना लहानपणापासूनच दृष्टी नव्हती. त्यांच्या भाकितांचा वैदिक व ज्योतिषाशी काहीही संबंध नाही. परंतु, जगातील सर्व देशांबाबत त्यांनी केलेली अनेक भाकितं आतापर्यंत खरी ठरली आहेत. आगीशी खेळ अंगाशी आला, तरुणाचा स्टंट जीवावर बेतला…. Video Viral बाबा वेंगा यांच्या भाकितांवर विश्वास ठेवणारे बरेच जण आहेत. त्याच अनुषंगाने पुढच्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये कोणत्या मोठ्या घटना घडतील, याबद्दल बाबा वेंगाने वर्तवलेली भाकितं लोकांना जाणून घ्यायची आहेत. तर, येणारं पुढचं वर्ष हे पृथ्वीसाठी फार चांगलं नसेल, असं बाबा वेंगा सांगून गेल्या आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात