मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मंकीपॉक्समध्ये शारीरिक संबंधांवरही बंधन; प्रसार रोखण्यासाठी इतके दिवस दूर राहण्याचा सल्ला

मंकीपॉक्समध्ये शारीरिक संबंधांवरही बंधन; प्रसार रोखण्यासाठी इतके दिवस दूर राहण्याचा सल्ला

बाधित व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. मंकीपॉक्स विषाणू लैंगिक संपर्काद्वारे देखील पसरू शकतो, यूकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये शारीरिक संबंधामध्ये काळजी घेण्याबाबत सांगितले आहे.

बाधित व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. मंकीपॉक्स विषाणू लैंगिक संपर्काद्वारे देखील पसरू शकतो, यूकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये शारीरिक संबंधामध्ये काळजी घेण्याबाबत सांगितले आहे.

बाधित व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. मंकीपॉक्स विषाणू लैंगिक संपर्काद्वारे देखील पसरू शकतो, यूकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये शारीरिक संबंधामध्ये काळजी घेण्याबाबत सांगितले आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 01 जून : कोरोनाच्या कहरानंतर जगभरात आता मंकीपॉक्सची चिंता निर्माण झाली आहे. हा रोग दोन डझनहून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि 300 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे सर्व पाहता जगभरातील देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. बाधित व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. मंकीपॉक्स विषाणू लैंगिक संपर्काद्वारे देखील पसरू शकतो, यूकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे असतील तर त्या व्यक्तीने त्याचा प्रसार रोखण्यासाठी सेक्स करू नये. विशेष म्हणजे, एका आठवड्यात ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचे 71 नवीन रुग्ण आढळून आले (UK issue guidance for monkeypox) आहेत.

8 आठवडे सेक्स नको -

या आजारात शरीराच्या कोणत्याही भागात छाले, व्रण, फोड यासारखे पुरळ बाहेर येऊ लागते. एखादी व्यक्ती मंकीपॉक्स विषाणूच्या संपर्कात आल्यास त्याला 21 दिवस विलगीकरणात राहावे लागते. सुरुवातीला, जेव्हा हा रोग आला तेव्हा बहुतेक प्रकरणे समलिंगी, उभयलिंगी लोकांमध्ये दिसून आली. हा आजार लैंगिक संबंधातून पसरणारा आजार नसून संक्रमित व्यक्ती लैंगिक संपर्काद्वारे दुसऱ्याला संक्रमित करू शकते. मंकीपॉक्स लैंगिक संपर्कात आल्याने होतो की नाही, याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही, असे या मार्गदर्शक तत्त्वात सांगण्यात आले असले, तरी लोकांना संसर्ग होताच 8 आठवडे कंडोमद्वारे लैंगिक संबंध ठेवावेत.

हे वाचा - Type 2 Diabetes असेल तर या 4 प्रकारची हिरवी पानं चावून खा; दिसेल चांगला परिणाम

जर एखाद्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसत असतील तर त्याने इतर लोकांशी संपर्क करणे थांबवावे, असे मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे. विशेषत: नवीन जोडीदार असलेल्या लोकांशी संबंध निर्माण करू नका. अशा लक्षणांच्या बाबतीत, ताबडतोब स्थानिक लैंगिक आरोग्य सेवेशी संपर्क साधा. यामुळे व्हायरसचा प्रसार थांबू शकतो. मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी 20 हजार लसी खरेदी करण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात असलेल्या लोकांना ते दिले जाईल.

हे वाचा - विवाहित पुरुषांनी यासाठी मनुके खायला हवेत; आरोग्याला असा होतो फायदा

नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीला त्यांची जखम बरी होईपर्यंत आणि जखमेतील खरुज कोरडे होईपर्यंत इतरांशी जवळचा संपर्क टाळण्याचे आवाहन करण्याच आलं आहे. पब्लिक हेल्थ वेल्सचे हेल्थ प्रोटेक्शनचे संचालक डॉ. गिरी शंकर म्हणाले की, आम्ही लोकांना खात्री देऊ इच्छितो की, मंकीपॉक्स लोकांमध्ये सहज पसरत नाही. सामान्य लोकांना त्याचा धोका खूप कमी आहे. त्यामुळे याला घाबरण्याची गरज नाही. पण त्याचा प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, आम्ही सर्व यंत्रणांसोबत काम करत आहोत. यासाठी लोक आणि एजन्सीमध्ये अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips