नवी दिल्ली, 31 मे : रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar level) नियंत्रणात राहावी यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींची काळजी घेणे गरजेचे आहे. साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहेत. तज्ज्ञांच्या मते, तुळशी, ऑलिव्ह आणि गुडमार यांसारख्या वनस्पतींची हिरवी पाने तुम्हाला मधुमेहाच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरतील. मधुमेह हा एक असा आजार आहे जो शरीराच्या सर्व अवयवांना हळूहळू बाधित करत जातो. व्यक्तीचे शरीर एकप्रकारे आतून खराब होत जातं. मात्र, योग्य दिनचर्येचा अवलंब करून आणि आरोग्यदायी आहाराचे पालन करून रक्तातील साखर नियंत्रणात (Type 2 Diabetes control tips) ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी ही हिरवी पानं चावून खावी 1. ऑलिव्ह पाने झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, ऑलिव्हची पाने चघळल्यानेही फायदा होईल. टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांनी ऑलिव्हची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. वर्ष 2013 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळून आले की ऑलिव्हच्या पानांच्या सेवनाने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते. या अभ्यासात 46 लोकांना ऑलिव्हची पाने खायला दिली गेली आणि 12 आठवड्यांनंतर असे दिसून आले की त्याचा मधुमेहाच्या रुग्णांना फायदा झाला. 2. स्टीव्हिया स्टीव्हिया म्हणजे गोड तुळस मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. 2018 च्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की ज्या रुग्णांनी गोड तुळस (स्टीव्हिया) खाल्ली त्यांना रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत झाली. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) आणि अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए) नुसार स्टीव्हिया पानांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे वाचा - कोरफडीपासून घरीच तयार करा असा शॅम्पू; केस होतील शायनी, मिळेल नॅचरल ग्लो 3. सलगमचा कंद आणि त्याची पाने सलगमच्या हिरव्या भाज्यांमध्ये म्हणजेच त्याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. अभ्यासानुसार, टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांनी फायबरचे सेवन केल्यास ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. सलगमची पाने चघळल्याने टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर, लिपिड आणि इन्सुलिनची पातळी सुधारते. हे वाचा - उन्हाळ्याच्या दिवसातही शरीरात राहील भरपूर ताकद; ही 5 होममेड ड्रिंक्स घ्या 4. गुडमारची पाने औषधी गुणधर्मांनी समृद्ध गुडमार रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ओळखले जाते. 2013 च्या अभ्यासानुसार, टाइप 1 आणि टाइप 2 च्या रुग्णांना 18 महिने गुडमारची पाने दिली गेली तेव्हा त्यांच्यामध्ये इन्सुलिन घेतलेल्या लोकांपेक्षा जास्त फरक होता. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.