सिडनी, 19 डिसेंबर: एका महिलेला (Woman) ड्रायव्हिंग (Driving) करताना फोनवर बोलल्याप्रकरणी (Talking on phone) पोलिसांनी दंड (Police fined) ठोठावला. मात्र त्यानंतर जे काही घडलं, त्यामुळे पोलीसच पस्तावले. प्रत्येक देशात वाहन चालवताना पाळण्यासाठीच्या नियमांची (Traffic rules) एक यादी असते. त्या त्या देशातील वाहतुकीचे नियम हे नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊनच तयार करण्यात आलेले असतात. मात्र अनेकजण या नियमांचं उल्लंघन करतात आणि अशा व्यक्तींवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. ऑस्ट्रेलियात नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत मात्र भलतंच घडलं.
महिलेला लावला दंड
ऑस्ट्रेलियात मिशेल नावाच्या महिलेला गाडी चालवताना फोनवर बोलल्याप्रकरणी पोलिसांनी 500 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 37 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला. आता म्हटलं तर ही एक सामान्य घटना आहे, असं कुणालाही वाटेल. मात्र हा दंड ठोठावल्यानंतर वस्तूस्थिती वेगळीच असल्याचं लक्षात आलं आणि सुरु झाली महिला विरुद्ध पोलीस अशी लढाई.
महिलेनं केला दावा
आपण प्रत्यक्षात फोनवर बोलत नव्हतो, असा दावा महिलेनं केला आहे. आपल्या हातात आईस्क्रीम होतं. त्याच्या आकारावरून पोलीस त्याला मोबाईल समजले आणि त्यातून आपल्याला दंड लावण्यात आला, असा दावा मिशेलनं केला. मात्र पोलिसांनी ही बाब मान्य करायला नकार दिला. मिशेल मोबाईलवरच बोलत होती, हा दावा कायम ठेवत कारवाई मागे घ्यायला पोलिसांनी नकार दिला.
मिशेलची न्यायालयात धाव
मिशेलनं ही लढाई पुढे नेण्याचं ठऱवत न्यायालयात धाव घेतली. आपल्या एका हातात मोबाईल होता आणि दुसऱ्या हातात फोन होता, असा दावा तिने केला. जो हात आपल्या कानापाशी होता, त्या हातात मोबाईल नसून फोन होता, हे सिद्ध करण्यासाठी तिने काही पुरावे कोर्टात सादर केले. यात आईस्क्रिम पार्लरमधून आईस्क्रीम खरेदी करतानाचं सीसीटीव्ही फुटेज आणि इतर काही पुरावे देत आपल्या ‘त्या’ हातात मोबाईल नव्हे, तर आईस्क्रीमच होतं, हे तिने सिद्ध केलं.
हे वाचा - OMG..! महाराष्ट्रात एकच चर्चा, 'या' म्हशीला पाहण्यासाठी जमतेय लाखोंची गर्दी
पोलिसांनी घेतली माघार
पोलिसांनी त्यानंतर माघार घेत तिचा दंड परत केला. आपला पोलिसांवर कुठलाही राग नसून ते केवळ त्यांचं कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करत होते, असं मिशेलनं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Police, Traffic police, Traffic Rules, Woman