मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ऑस्ट्रेलियन मॉडेलला कपड्यांमुळं मिळाली अपमानास्पद वागणूक : विमानात बसण्यास केली मनाई

ऑस्ट्रेलियन मॉडेलला कपड्यांमुळं मिळाली अपमानास्पद वागणूक : विमानात बसण्यास केली मनाई

Australian model

Australian model

इंस्टाग्राम मॉडेल इझाबेल एलेनोर यांना ऑस्ट्रेलियामध्ये जेस्टारच्या विमानात बसण्यापूर्वी अंग झाकण्यासाठी सांगण्यात आलं आणि तिच्या क्रॉप टॉपवर (Crop Top) तिला एक अंग झाकलं जाईल अशा प्रकारचं बनियान(hi-vis vest) घालण्यास दिल गेलं. त्यानंतर विमान कंपनीने माफीदेखील मागितली आहे.

पुढे वाचा ...

मेलबर्न, 5 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियन मॉडेल इसाबेला इलेनोरे (Isabelle Eleanore) हिला कपड्यांमुळं आपल्याच देशात अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट ते मेलबर्नदरम्यान प्रवास करताना तिला ही अपमानास्पद(Humiliating) वागणूक मिळाल्याचं तिनं आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर पोस्ट करत सांगितलं. विमानतळावर विमानात चढत असताना तिचा पोशाख योग्य(Inappropriate) नसल्याचं कारण देत तिला विमानात बसण्यास मनाई करण्यात आली. जेट्स्टार(Jetstar) या विमान कंपनीच्या उड्डाणाआधी तिला तिचे कपडे व्यवस्थित नसल्याचं सांगण्यात आलं. यामुळं तिच्या क्रॉप टॉपवर (Crop Top) तिला एक अंग झाकलं जाईल अशा प्रकारचं बनियान(hi-vis vest) घालण्यास सांगण्यात आलं.

आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर यासंदर्भात एक पोस्ट करत विमान कंपनीकडून मिळालेल्या भेदभावाची माहिती दिली. जेट्स्टारकडून (Jetstar) आपल्याला अपमानास्पद आणि पुराणमतवादी वागणूक मिळाल्याचं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डेलीमेल मध्ये आलेल्या वृत्तानुसार 1 फेब्रुवारीला तिच्यासोबत ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ तिने पोस्ट केला असून फ्लाईट अटेंडंटने तिला हे कपडे योग्य नसून बिकिनीसारखे असल्याचं म्हटल्याचं तिनं आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. OnlyFans ची मॉडेल असलेल्या इसाबेलान आपल्या जीन्सवर एक क्रॉप टॉप (Crop Top) परिधान केला होता. विमानात बसण्याआधी चेकइन करताना तिला कुणीही काहीही बोललं नसल्याचं देखील तिनं म्हटलं आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्याकडं तिरस्काराचा भावनेनं पाहिल्याचं देखील म्हटलं आहे. पण विमान बसण्याआधी तिच्या कपड्यांवर आक्षेप घेण्यात आल्याचं तिनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.

जेट्स्टारकडून (Jetstar) मिळालेल्या या वागणुकीनं तिला वाईट वाटलं असून तिनं विमानाच्या आतमधील देखील व्हिडीओ पोस्ट केला आहे. कोरोनाच्या या संकटकाळात तिला इतरांचे कपडे घालण्यास सांगण्याच्या कृतीवर देखील तिनं प्रश्न उपस्थित केले आहेत. 9 न्यूज बरोबर बरोबर बोलताना हे 2021 असून 1921 नसल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर तिला हवे ते कपडे परिधान करण्याचा स्वातंत्र असल्याचं देखील तिनं म्हटलं आहे. तिने आपला विमानात परिधान केलेल्या कपड्यांचा फोटो पोस्ट करत मला 1921 च्या ऑस्ट्रेलियात राहायला आवडत असल्याचं म्हटलं आहे. या फोटोवरून तिनं विमान कंपनीवर जोरदार टीका केली आहे.

हे देखील वाचा -  भयंकर! आत्महत्या करण्यासाठी 17 व्या मजल्यावरून मारली उडी आणि थेट 5 महिन्यांच्या बाळावर कोसळला

 दरम्यान, जेट्स्टारकडून (Jetstar) यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं असून विमानात प्रवास करण्यासाठी शूज घालायला हवे हे त्यांच्या नियमावलीत आहे. परंतु क्रॉप टॉप न घालण्याचा नियम त्यांच्या पॉलिसीमध्ये नाही. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने 9 न्युजशी बोलताना इसाबेल बरोबर झालेल्या घटनेविषयी माफी मागितली आहे. कंपनीने इसाबेलची माफी मागितल्याचं त्यानं यावेळी सांगितलं. विमान कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून गैरसमजातून हा प्रकार झाल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. याचबरोबर ज्या कपड्यांद्वारे नियमांचं किंवा पॉलिसीचे उल्लंघन होत आहे त्या कपड्यांवर बंदी असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. अनेकजण वर्णद्वेषी टिप्पणी किंवा स्लोगन असलेलं कपडे परिधान करतात. त्यामुळं त्यांना झाकण्यासाठी सांगितलं जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं.

www.news18.com/news/buzz/australian-airline-makes-model-wear-a-vest-to-cover-up-crop-top-before-allowing-her-to-board-3392984.html

First published:

Tags: Australia, Instagram, Model