मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भयंकर! आत्महत्या करण्यासाठी 17 व्या मजल्यावरून मारली उडी आणि थेट 5 महिन्यांच्या बाळावर कोसळला

भयंकर! आत्महत्या करण्यासाठी 17 व्या मजल्यावरून मारली उडी आणि थेट 5 महिन्यांच्या बाळावर कोसळला

फोटो सौजन्य - डेली मेल

फोटो सौजन्य - डेली मेल

इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करणारी ही व्यक्ती बाबागाडीवर कोसळली. बाबागाडीचे तुकडे तुकडे झाले आणि याच बाबागाडीत चिमुकला जीवही होता.

मॉस्को, 05 फेब्रुवारी : लोक आत्महत्येसारखं (suicide) टोकाचं पाऊल उचलतात. स्वत:चं आयुष्य संपवतात. पण अशाच एका आत्महत्येनं एक नाही तर दोन बळी गेले आहेत. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचं आयुष्य संपवता संपवता नकळतपणे एका चिमुरड्याचंही आयुष्य संपवलं आहे. इमारतीवरून त्यानं उडी मारली आणि तो थेट अवघ्या 5 महिन्यांच्या चिमुरड्यावर कोसळला. त्याच्याखाली दबून बाळाचा मृत्यू झाला आहे. आईच्या डोळ्यादेखत ही धक्कादायक घटना घडली.

रशियाच्या (Russia) व्होरोनेझ शहरात  गुरुवारी ही हादरवणारी घटना घडली आहे. एक महिला आपल्या बाळाला बाबागाडीतून घेऊन रस्त्यावर चालत होती. तिला रस्ता ओलांडायचा होता. रोड क्रॉस करण्यासाठी म्हणून ती वळली. इतक्यात ती जिथं उभी होती तिथल्या इमारतीवरून आत्महत्या करण्यासाठी एका व्यक्तीनं उडी मारली. ही व्यक्ती वेगानं खाली कोसळली ती थेट बाबागाडीवर कोसळली.

बाबागाडीचे तुकडे तुकडे झाले. त्यात चिमुकला होता, तोही दबला. आईनं हंबरडा फोडला. तिच्या डोळ्यासमोर हे सर्व घडलं. त्या व्यक्तीला बाजूला करून तिनं आपल्या बाळाला बाहेर काढलं. त्याला उचलून हातात घेतलं आणि कुशीत धरलं. बाळाचाही हालचाल होत नव्हती. मोठमोठ्यानं ती रडू लागली आणि मदत मागू लागली.

हे वाचा - 2 वर्षांच्या मुलानं मुलींसारखे वाढवले केस; कारण वाचून तुम्हालाही हेवा वाटेल

तिथं असलेल्या काही लोकांनी  तिथल्या लोकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावलं. बाळाला तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पण दुर्दैवानं बाळाचंही आयुष्य संपलं होतं.

त्या बाबागाडीवर कोसळलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पण चिमुकला त्या बाबागाडीतच होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आईच्या डोळ्यादेखतच तिच्या लेकराचा करुण अंत झाला.

First published:

Tags: Russia, Small baby, Suicide