पर्थ (ऑस्ट्रेलिया) 15 जून : अथांग महासागरात एक दुर्गम बेट (Isolated Island) जिथे ना खाण्यास काही ना काही सोयी सुविधा. अशा परिस्थितीत काही लोकं जीवन जगतात. हे आपण आजपर्यंत सिनेमामध्येच बघितलं असेल. मात्र असं प्रत्यक्षात घडलं तर? अशीच एक घटना श्रीलंकेतील (Shri Lanka country) एका तामिळ कुटुंबासोबत घडली आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) सरकारकडून या कुटुंबाला गेल्या 3 वर्षांपासून एका दुर्गम बेटावर कैद करून ठेवण्यात आलं होतं. (Australian government finally released Murugappan Family from isolated island)
ऑस्ट्रेलियात इमिग्रेशन (Immigration rules) संबंधित कायदे अधिकच कठोर आहेत. याच कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून श्रीलंकेतील एका तामिळ कुटुंबाला महासागरातील एका दुर्गम अशा बेटावर गेल्या 3 वर्षांपासून कैद करण्यात आलं होतं. मुरुगप्पन दाम्पत्याला त्यांच्या 2 लहान मुलींसह कैद ठेवण्यात आलं होतं. इतकंच नाही तर कुटुंबाबातील सदस्यांना एकमेकांपासून दूर ठेवण्यात आलं होतं.
टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, मुरुगप्पान यांच्या 4 वर्षांच्या मुलीची प्रकृती अचानक बिघडली. ब्लड इन्फेक्शन आणि न्यूमोनियामुळे तिला त्वरित पर्थ शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या कुटुंबातील सदस्यांना एकमेकांना भेटण्याची परवानगी नव्हती. अखेर मुरुगप्पन कुटुंबाला नागरिकांचं समर्थन मिळालं आणि ऑस्ट्रेलिया सरकार झुकलं. मुरुगप्पन कुटुंबातील 6 वर्षांची कोपिया आणि तिचे वडील नादेस यांना त्यांच्या लहान मुलीला आणि पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली.
हे वाचा - Corona: 'डेल्टा +' व्हेरियंट भारतासाठी किती घातक? शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा
आता मुरुगप्पन कुटुंब त्यांच्या मुलीची प्रकृती ठीक होईपर्यंत पर्थमधीलच एका अपार्टमेंटमध्ये राहणार आहे. ते कुठेही मुक्त संचार करू शकणार आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारकडून या कुटुंबाला भेटण्याची परवानगी जरी देण्यात आली असली तरी त्यांना डिटेन्शनमध्ये ठेवण्यात येणार आहे. सरकारकडून या कुटुंबावर नजर ठेवली जाणार आहे.
मुरुगप्पन कुटुंबाची कहाणी
मुरुगप्पन कुटुंबाची कहाणी एखाद्या सिनेमातील कहाणीसारखीच आहे. 2018 साली या ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या या कुटुंबाचा visa संपला. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया सरकारनं राहत्या घरातून बाहेर काढलं. याचा विरोध करताच त्यांना ऑस्ट्रेलियापासून दूर असलेल्या क्रिसमस आयलंड (Christmas Island) वर सुरक्षा रक्षकांच्या नजरकैदेत ठेवण्यात आलं.
क्रूर वागणूक
2019 मध्ये या कुटुंबाला 2 तासात सामान बांधा आणि श्रीलंकेला रवाना व्हा असे आदश देण्यात आले. इतकंच नाही तर त्यांना जबरजस्ती विमानात बसवण्यात आलं. मात्र नदेसा यांनी आपल्या वकिलाला फोन केला तसंच सर्व घटनेचं रेकॉर्डिंग आपल्या फोनमध्ये केलं त्यामुळे सरकारला हे विमान परत बोलवावं लागलं.
हे वाचा - कोरोना लस घेतल्यावर 68 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू; देशात पहिल्याच घटनेची नोंद
ऑस्ट्रेलियातील नागरिकांचा पुढाकार
मुरुगप्पन कुटुंबाला ऑस्ट्रलिया सरकारकडून देण्यात आलेली वागणूक सोशल मीडियाच्या माध्यमातून हळूहळू सर्वांना समजली. त्यांची व्यथा ऐकून बिलोएला, पर्थ, सिडनी आणि ऑस्ट्रेलियातील इतर सर्व शहरांमधून नागरिकांनी मुरुगप्पन कुटुंबाला मदत करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ मोठी मोहीम उभारण्यात आली.याचमुळे ऑस्ट्रेलिया सरकार झुकलं आणि अखेर या कुटुंबाला न्याय मिळण्यास मदत झाली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Immigrant officer, Prisoners, Tamilnadu