मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Coronavirus: 'डेल्टा +' व्हेरियंट भारतासाठी किती घातक? शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Coronavirus: 'डेल्टा +' व्हेरियंट भारतासाठी किती घातक? शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

कोरोनामधून बरं झाल्यानंतरही धोका कमी होत नाही. कोरोना पेशंट बरा झाल्यानंतर शरीरातल्या कमी झालेल्या प्लेटलेट्स अनेक आठवडे कमीच राहतात. व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स कमी होतात आणि काही आठवड्यांनी वाढतात देखील. मात्र कोरोनाच्या बाबतीत तसं नाहीये.

कोरोनामधून बरं झाल्यानंतरही धोका कमी होत नाही. कोरोना पेशंट बरा झाल्यानंतर शरीरातल्या कमी झालेल्या प्लेटलेट्स अनेक आठवडे कमीच राहतात. व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स कमी होतात आणि काही आठवड्यांनी वाढतात देखील. मात्र कोरोनाच्या बाबतीत तसं नाहीये.

कोरोना विषाणूचा (Coronavirus) डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) आता अधिक डेल्टा प्लसमध्ये बदलला आहे. मात्र, भारतात सध्या याबाबत चिंतेची काहीही बाब नाही.

नवी दिल्ली 15 जून : कोरोना विषाणूचा (Coronavirus) डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) आता अधिक डेल्टा प्लसमध्ये बदलला आहे. मात्र, भारतात सध्या याबाबत चिंतेची काहीही बाब नाही. कारण, देशात अजूनही याची खूप कमी प्रकरणं आहेत. शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली आहे. डेल्टा प्लस हा डेल्टा किंवा ‘बी1.617.2’ याचंच रौद्र रुप आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळला होता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच जबाबदार होता. व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही. भारतात नुकतंच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे. मात्र, ही पद्धतचही डेल्टा प्लसपुढे निष्प्रभ ठरत असल्याचं म्हटलं जात आहे.

दिल्लीस्थित सीएसआयआर- इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) चे वैज्ञानिक विनोद स्कारिया यांनी रविवारी ट्विट केले, की "के 417 एन च्या परिवर्तनामुळे बी 1.617.2 व्हेरियंट बनला आहे, याला एवाय .1 नावानंही ओळखलं जातं."

एकेकाळी ठरले कोरोना हॉटस्पॉट; मुंबई, पुण्यातील या भागाने घेतला मोकळा श्वास

ते म्हणाले की सार्स सीओवी-२ च्या स्पाइक प्रोटीनमध्ये हे परिवर्तन घडले आहे, जे विषाणूला मानवी पेशींमध्ये संक्रमित करण्यास मदत करते. स्कारिया यांनी ट्विटरवर लिहिले की, “भारतात के 417 एनची प्रकरणं अद्याप फार नाहीत. याची प्रकरणं मुख्यतः युरोप, आशिया आणि अमेरिकेतून समोर आले आहेत. स्कारिया असेही म्हणाले आहे, की व्हेरियंटमध्ये झालेला हा बदल विषाणूंविरूद्धच्या प्रतिकारशक्तीशी देखील संबंधित असू शकतो. नवीन प्रकारच्या विषाणूमुळे 'अँटीबॉडी कॉकटेल' च्या वापराला फटका बसला असला तरी याचा अर्थ असा नाही की व्हायरस जास्त संक्रामक आहे किंवा त्यामुळे रोग आणखी प्राणघातक होईल.

पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेतील प्राध्यापक संघाने पीटीआयला सांगितले की, “हा नवा प्रकार किती संक्रामक आहे किंवा याचा किती झपाट्याने प्रसार होण्याची क्षमता आहे, याची चाचणी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Corona spread, Corona virus in india