Home /News /news /

VIDEO : डॉक्टर महिलेसोबत धक्कादायक प्रकार, कोरोनाच्या संशयामुळे शेजाऱ्यांनी केली शिवीगाळ

VIDEO : डॉक्टर महिलेसोबत धक्कादायक प्रकार, कोरोनाच्या संशयामुळे शेजाऱ्यांनी केली शिवीगाळ

जनतेची सेवा करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, पोलीस आणि सफाई कामगार आपल्यासाठी काम करत आहेत. पण म्हणून त्यांच्याशी वाईट वर्तन केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    सूरत, 06 एप्रिल : कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सगळा व्यवसाय ठप्प झाला आहे. सगळ्यांना घरात राहण्याचं आवाहन केलं असताना जनतेची सेवा करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, पोलीस आणि सफाई कामगार आपल्यासाठी काम करत आहेत. पण म्हणून त्यांच्याशी वाईट वर्तन केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूरजमधला हा व्हिडिओ नीट पाहा. यामध्ये एक महिला डॉक्टर घरी आल्यानंतर तिच्या श्वानाला घेऊन बाहेर गेली असता शेजाऱ्यांकडून तिच्याशी वाईट वागणूक केली गेली. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल अशा हेतूने तिच्याशी वाद घातला गेला. आणि खालच्या पातळीवर जात शिविगाळही केला गेला. या सगळ्या प्रकाराचा डॉक्टर महिलेने व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तापस सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर, स्वत:च्या आरोग्याचा विचार न करतात पोलीस, डॉक्टर, नर्स आणि सफाई कामगार हे युद्धाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. पण म्हणून त्यांना कोरोना झाला आहे. या दृष्टीने पाहणं आणि त्यांच्याशी तशा प्रकारे वागणं हे कितपत योग्य आहे?
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या