नवी दिल्ली, 06 एप्रिल : भारतासह जगभरात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. यातही लोकांना अनेक अडचणी येत आहेत. मात्र या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस, प्रशासन आणि डॉक्टर तत्परता दाखवत आहेत. एवढंच काय प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे लोक जनतेची मदत करत आहेत. दिल्लीत एका महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या होत्या. त्यावेळी कोणत्याच रुग्णवाहिकेच्या क्रमांकावर कॉल केल्यानंतर उत्तर मिळालं नाही. तेव्हा महिलेनं पोलिसांना फोन केला. महिलेचा फोन येताच पोलिसांनी तिला रुग्णालयात पोहोचवलं. त्यानंतर महिलेनं एका मुलीला जन्म दिला. महिलेच्या पतीनं सांगितलं की, पत्नीला एक एप्रिलला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. तेव्हा रुग्णवाहिकेसाठी सर्व फोन लावले पण कोणीही फोन उचलला नाही. त्यानंतर दिल्ली महिला पोलिसांना फोन लावला. तेव्हा पोलिसांनी गाडी पाठवली. हे वाचा- कोरोना राहिला बाजूला, भावानेच घेतला बहिणीचा जीव; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना मुलीला जन्म दिल्यानंतर महिलेनं सांगितलं की, सगळीकडं कोरोनाची भीती पसरली आहे. असा अडचणीच्या वेळी दिल्ली पोलीस देवदूत बनून आले. मनापासून त्यांचं आभार मानायचे आहेत. त्यांचं काम खूपच चांगलं आहे. कोणाला वाटत असेल की ते मदत करत नाही तर ते चुकीचं आहे. दिल्ली पोलिसात दक्षिण विभागात पीसीआर इन्चार्ज असलेल्या पूनम पारेख यांनी सांगितलं की, आमचा स्टाफ या परिस्थितीत काम करण्यासाठी पूर्ण प्रशिक्षित आहे. आता ती महिला रुग्णालयातून सुरक्षित पोहोचावी यासाठी प्रयत्न करू. आतापर्यंत आम्ही अशा 155 महिलांची मदत केली आणि लॉकडाउनच्या काळात आमचं याला प्राधान्य असेल. हे वाचा- कोरोना संक्रमणात ‘तबलिगी’चा हात उघडकीस आणल्यानंतर न्यूज अँकर,पत्रकारांना धमक्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.