मराठी बातम्या /बातम्या /विदेश /4,30,00,00,000 रुपये! एवढ्या किंमतीला विकलं गेलं आशियातील सर्वात महागडं अपार्टमेंट

4,30,00,00,000 रुपये! एवढ्या किंमतीला विकलं गेलं आशियातील सर्वात महागडं अपार्टमेंट

आशियातील सर्वात महागड्या अपार्टमेंटची विक्री हाँगकाँगमध्ये झाली आहे. एवढी किंमत वाचून नक्कीच एखादी व्यक्ती चक्रावून जाऊ शकते

आशियातील सर्वात महागड्या अपार्टमेंटची विक्री हाँगकाँगमध्ये झाली आहे. एवढी किंमत वाचून नक्कीच एखादी व्यक्ती चक्रावून जाऊ शकते

आशियातील सर्वात महागड्या अपार्टमेंटची विक्री हाँगकाँगमध्ये झाली आहे. एवढी किंमत वाचून नक्कीच एखादी व्यक्ती चक्रावून जाऊ शकते

मुंबई, 18 फेब्रुवारी: हाँगकाँगमध्ये विक्री करण्यात आलेलं एक अपार्टमेंट आशिया खंडातील सर्वात महागडं अपार्टमेंट ठरलं आहे. हाँगकाँगमधील प्रसिद्ध बिझनेस टायकून व्हिक्टर ली च्या सीके असेट होल्डिंग्ज लिमिटेडने 21 बोरेट रोड प्रोजेक्टमधील या अपार्टमेंटची विक्री केली आहे. दरम्यान याची खरेदी कुणी केली आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

हाँगकाँग त्याठिकाणी असणाऱ्या महागड्या अपार्टमेंटसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान सध्या जगभरात कोरोनामुळे आर्थिक संकट असताना याठिकाणी एका व्यावसायिकाने अपार्टमेंटचा सर्वात महागडा करार केला आहे. व्हिक्टर लीने 430 कोटीमध्ये हे अपार्टमेंट विकले आणि रेकॉर्ड रचला आहे. 5 बेडरुम असणाऱ्या या अपार्टमेंटमध्ये स्विमिंग पुल, प्रायव्हेट रुफ आणि 3 पार्किंग स्पेस आहेत.

(हे वाचा-या जोडप्यानं पूर्ण केली घराची हौस, लग्झरी डबलडेकर बसचं रुपांतर केलं अलिशान घरात)

एवढा आहे अपार्टमेंटचा एरिया

21 बोरेट रोड प्रकल्पातील हे पाच बेडरूमचे अपार्टमेंट 3,378 चौरस फूट (314 वर्ग मीटर)) भागात आहे. या जागेची किंमत 136000 हाँगकाँग डॉलर प्रति चौरस फूट आहे.

(हे वाचा-म्यानमार सत्तापालट; सलग दुसऱ्या दिवशी इंटरनेट सेवा बंद असल्याने नागरिक रस्त्यावर)

इतर अपार्टमेंटची विक्री देखील वाढेल

या अपार्टमेंटमध्ये खाजगी रुफ, तीन पार्किंगची जागा आणि एक स्विमिंग पूल आहे. हे कुणी खरेदी केले याबाबत माहिती देण्यात आली नाही आहे. परंतु जगातील सर्वात महागड्या लक्झरी रहिवासी बाजारापैकी एक असणाऱ्या या अपार्टमेंटची विक्री हाँगकाँगमध्ये झालेल्या गृहनिर्माण क्षेत्रातील सुधारणेमुळे झाली आहे. परिणामी अशा अपार्टमेंटची मागणी वाढली आहे. या विक्रीनंतर इतर प्रकल्पांच्या अपार्टमेंटची विक्रीही वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Asia expensive apartment, Expensive apartment sold, Hong kong, International, Money, Super expensive