मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

या जोडप्यानं पूर्ण केली घराची हौस, लग्झरी डबलडेकर बसचं रुपांतर केलं अलिशान घरात

या जोडप्यानं पूर्ण केली घराची हौस, लग्झरी डबलडेकर बसचं रुपांतर केलं अलिशान घरात

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी घरात अंधार ठेवू नये. घरात जेवढा जास्त प्रकाश असेल तितकी सकारात्मकता घरात येते. संध्याकाळी घरात कोणत्याही भागात अंधार असू नये.

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी घरात अंधार ठेवू नये. घरात जेवढा जास्त प्रकाश असेल तितकी सकारात्मकता घरात येते. संध्याकाळी घरात कोणत्याही भागात अंधार असू नये.

स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न कोण पाहत नाही? या जोडप्यानं मात्र चक्क बसला आपलं घर बनवलं आहे.

  • Published by:  News18 Desk

वॉशिंग्टन, 17 फेब्रुवारी : चार्ली मॅकविकर आणि तिचा बॉयफ्रेंड ल्यूक वॉकर यांनी एकत्र राहण्याचा निर्णय  घेतला. त्यांनी आपल्यासाठी एक आलिशान घर खरेदी केलं नाही तर एक जुनी बस (old bus) विकत घेतली.

त्या दोघांनी 544 स्क्वेअर फूट लंडन डबल डेकर बसला लग्झरी होममध्ये (turned a bus into a luxury home) बदललं. त्या दोघांना भाड्याच्या घरात जास्त पैसे द्यायचे नव्हते. चार्लीच्या वडिलांची स्वतःची जमीन (father's property) आहे. चार्ली आणि ल्यूक या कपल(couple) नं मिळून हे ठरवलं, की त्या जमिनीची किंमत देऊन तिथं आपल्या बसमध्ये बनलेल्या घराला शिफ्ट करूया. Metro नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

त्यांच्या आलिशान घरात फायर प्लेस अर्थात शेकोटी, बाथटब, लाकडाचं इंधन असलेला स्टोव्ह आणि कपाटही ठेवलं गेलं आहे. सोबतच एक बिछाना आणि टीव्हीही (TV) ठेवलेला आहे. इथल्या किचन (kitchen) आणि दिवाणखान्याला खूपच सौंदर्यदृष्टीनं सजवलं आहे.

या भव्य घरात मायक्रोवेव्ह, ओव्हन, फार्म हाऊस, सिंक, फ्रिज आणि वॉशिंग मशिनही (washing machine) ठेवलेली आहे. इथल्या डायनिंग रूममध्ये तीन लोक बसू शकतात. दिवाणखान्यात दोन बेंचेस आहेत. या बसला घराचं रूप देण्यासाठी चार्ली आणि त्याच्या बॉयफ्रेंडला एक वर्ष लागलं.

हेही वाचा...म्हणून या चॉकलेट बॉक्सची किंमत आहे तब्बल 10 कोटी रुपये

कोरोनाची साथ (corona pandemic) आल्यानंतर लॉकडाऊन (lock down) लागलं तसं हे दोघे आपलं ऑफिसचं (office work) कामसुद्धा याच बसमधल्या घरात बसून करत आहेत. ही बस सगळ्याच सोईसुविधांनी संपन्न आहे. इथं वाय-फाय, वीज आणि पाण्याचीही खूप चांगली व्यवस्था केलेली आहे.

बसच्या बाहेर आउटडोअर सिटिंगचीही व्यवस्था आहे. तिथंच दोन बकऱ्या बांधलेल्या आहेत. या घरातून सुंदर तळ्याचं मनमोहक दृश्यही दिसतं. या डबल डेकर बसमध्ये राहणं आपलं स्वप्न असल्याचं चार्ली आणि ल्युक सांगतात. दोघेही इथं राहून खूप आनंदी आहेत. आता इथं एक एसी लावण्याचाही त्यांचा विचार आहे.

First published:

Tags: Coronavirus, Double decker bus, Innovation, Lockdown, Private bus, Technology, United States of America