इस्लामाबाद, 29 जानेवारी: आर्थिक संकटांचा सामना करणारा पाकिस्तान कर्जामध्ये बुडतच चालला (Pakistan total Debt) आहे. कोरोना महामारीमुळे (Covid -19) पाकिस्तानची परिस्थिती आणखीनच वाईट होत चालली आहे. अशा परिस्थितीत एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून (ADB) पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. एडीबी बँक इम्रान खान सरकारला पुढच्या 5 वर्षांत 73 हजार कोटींचे म्हणजे 10 बिलियन डॉलरचे कर्ज देणार आहे. त्यामुळे इम्रान खान (Imran Khan) सरकारला दिलासा मिळाला आहे. एडीबीने यासंदर्भात असे सांगितले की, हे कर्ज पाकिस्तानमध्ये आर्थिक स्थीरता आणण्यासाठी मदतीचे ठरेल. दरम्यान, एशियन डेव्हलपमेंट बँकचे मुख्यालय फिलिपिन्सची राजधानी मनीला येथे आहे. ही बँक आपल्या खंडातील देशांना कर्जाचा पुरवठा करते.
मिळालेल्या माहितीनुसार, एडीबी बँकेकडून (Asian Development Bank) मिळणारी कर्जाची रक्कम पाकिस्तानला 2021 ते 2025 या काळामध्ये दिली जाणार आहे. यामधील 6.3 बिलियन डॉलर्सची रक्कम पुढील तीन वर्षांमध्ये दिले जाणार आहे. या रकमेमध्ये पाकिस्तान रोजगार आणि आर्थिक विकासासाठी नवीन संधी उपलब्ध करण्यासोबतच नागरिकांच्या हितासाठी कर्ज योजना सुरु करणार आहे. अलीकडेच पाकिस्तानने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 1.2 बिलियन डॉलर्सचे (87,56,58,00,000 रुपये) नवीन कर्ज घेतले होते.
(हे वाचा-बायको विसरली स्वतःचाच चेहरा आणि गैरसमजातून नवऱ्यावर केला भयानक चाकूहल्ला)
पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगितले की, '2020-21 या आर्थिक वर्षातील जुलै-डिसेंबर दरम्यान इम्रान सरकारला अनेक वित्तपुरवठा स्रोतांकडून 5.7 अब्ज डॉलर्स बाह्य कर्ज म्हणून रक्कम मिळाली. डिसेंबरमध्ये पाकिस्तान सरकारने परदेशातून 1.2 अब्ज डॉलर्स प्राप्त केले आहे. ज्यामध्ये व्यावसायिक बँकांकडून उच्च व्याजदराने घेतलेल्या 434 दशलक्ष डॉलर रकमेचा समावेश आहे.
इम्रान खान सरकारच्या निकृष्ट आर्थिक सुधारणांमुळे 2020 अखेरीस पाकिस्तानचे एकूण कर्ज 11.5 टक्के वर्षाच्या दराने वाढून 35.8 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहचले. त्यानंतर स्वत:च्या चुका मागच्या सरकारवर ढकलून पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयाने सांगितले होते की, मागच्या सरकाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाला अत्याधिक विनियम दर आणि अत्याधिक कर्जाचा सामना करावा लागत आहे.
(हे वाचा - सर्वात श्रीमंत व्यक्तीने गर्लफ्रेंडच्या भावाकडे मागितली 12 कोटींची नुकसान भरपाई)
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ऐवढी बिकट झाली आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी इम्रान खान सरकारला तडजोड करावी लागत आहे. पाकिस्तानचा सर्वात मोठा दाता सौदी अरब आणि यूएईने त्यांनी घेतलेल्या अनेक अब्ज डॉलर कर्जाला परत मागितले आहे. पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र देश चीनने सुद्धा आता पाकिस्तानला कर्ज देण्यास टाळाटाळ केलीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.