Home /News /videsh /

बायको विसरली स्वतःचाच चेहरा आणि गैरसमजातून नवऱ्यावर केला भयानक चाकूहल्ला

बायको विसरली स्वतःचाच चेहरा आणि गैरसमजातून नवऱ्यावर केला भयानक चाकूहल्ला

तुझ्याबरोबर फोटोत दिसणारी बाई कोण असं विचारत बायकोने नवऱ्यावर चाकूनं वार करत त्याला गंभीर जखमी केलं.

    मेक्सिको, 28 जानेवारी : जगात अनेकदा अशा काही विचित्र घटना घडतात, की त्यांच्या सत्यतेवर विश्वास ठेवणंही कठीण होऊन बसतं. अशीच एक घटना मेक्सिकोमध्ये (Mexico) घडली आहे. झालं असं, की मेक्सिकोत नुकतीच एक भयानक घटना घडली. यात लियोनोरा नावाच्या महिलेनं आपल्या पतीवर चाकूनं (knife) पुन्हा-पुन्हा वार करत त्याला गंभीर जखमी केलं. त्यामागचं कारण असं, की तिला काही फोटोज (photos) मिळाले होते, ज्यात तिचा पती (husband) एका दुसऱ्या महिलेसोबत (woman) दिसतो आहे. मात्र काही काळानंतर तिला आपण मोठीच चूक केल्याचं लक्षात आलं. आता याच चुकीमुळं तिला जेलमध्येही (Jail) जावं लागणार आहे. मेक्सिकोच्या सोनोरा शहरात लियोनोराच्या घरातून एकाएकी खूप ओरडण्याचे आवाज येऊ लागले. या महिलेच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस (police) आले तेव्हा त्यांना दिसलं, की जुआन नावाचा पुरुष तिथे वेदनेने विव्हळत पडला असून त्याच्या शरीरावर खूप जखमा आहेत. पोलिसांनी तिथं उपस्थित असलेल्या लिओनोराला अटक केली. लिओनोराला आपल्या पतीजवळ काही फोटोज सापडले. यात तो एका महिलेसोबत झोपला होता. हे फोटोज बघून लिओनोरा खूप संतापली. तिनं रंगाच्या भरात चाकू उचलून पतीवर वार केले. यादरम्यान ती पती जुआनला शिव्याही देत राहिली. जुआननं स्वतःला कसंबसं वाचवलं आणि लिओनोराला तिच्या वागण्याचं कारण विचारू लागला. तिनं त्याला या फोटोजबद्दल सांगितलं, तेव्हा तो थक्क झाला. त्यानं तिला सांगितलं, की हा आपल्या दोघांचाच खूप जुना फोटो आहे. यात ही महिला खूप बारीक होती आणि तिनं मेकअप (Make up) केलेला होता. त्यामुळं ती स्वतःला अजिबात ओळखू शकली नाही. जुआननं हे फोटो काही दिवसांपूर्वी आपल्या ईमेलमध्ये पाहिले होते आणि त्यांना आपल्या फोनमध्ये सेव्ह केलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Photos, Wife and husband, Woman

    पुढील बातम्या