Home /News /lifestyle /

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बेझोस यांनी गर्लफ्रेंडच्या भावाकडे मागितली 12 कोटीची नुकसानभरपाई

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बेझोस यांनी गर्लफ्रेंडच्या भावाकडे मागितली 12 कोटीची नुकसानभरपाई

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझोस सतत चर्चेत असतात. आता मात्र ते एका वैयक्तिक वादातून बातम्यांचा विषय झाले आहेत.

    वॉशिंग्टन, 28 जानेवारी : अमेझॉनचा (Amazon) मालक आणि जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारा माणूस म्हणजे जेफ बेझोस (Jeff Bezos). जेफ नुकताच एका खासगी कारणामुळं चर्चेत आला आहे. झालं असं, की जेफनं आपल्या गर्लफ्रेंडच्या (Jeff Bezos girlfriend) भावाकडे नुकसान भरपाई म्हणून मोठी रक्कम मागितली आहे. ही रक्कम आहे तब्बल 12.3 कोटी रुपये. यात पूर्वी घडलेल्या घटनाक्रमात गर्लफ्रेंड लॉरेन सॅन्चेझ हिचा भाऊ मायकल यानं बेझोस यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. मायकल हा खटला हरले. आता याच कारणानं बेझोस यांनी मायकल यांच्याकडे कायदेशीर शुल्काच्या (legal fees) रुपात खर्च झालेले पैसे चुकवण्याची मागणी केली आहे. ही रक्कम 12.3 कोटी इतकी होते. या वादाची (controversy) 2019 मध्ये झाली होती. तेव्हा लॉरेन आणि बेझोस आपापल्या जोडीदारासोबत वैवाहिक नात्यात होते. मात्र दोघांच्या लपूनछपून सुरू असलेल्या अफेअरबाबत (affair) नॅशनल इन्कक्विरर आणि पेज सिक्स या दोन मासिकांना समजलं. मासिकात लॉरेन आणि बेझोस यांचे काही खासगी मेसेजेस आणि संदेश छापले गेले. मासिकात फोटो छापून येण्याच्या काही तास आधी बेझोस यांनी आपण पत्नी (wife) मॅकेन्झीपासून घटस्फोट (divorce) घेत असल्याचं जाहीर केलं. यानंतर लॉरेनचे भाऊ मायकल यांनी आरोप केला, की बेझोसनं पत्रकारांना (journalists) सांगितलं, की मायकलनं काही खासगी फोटोज लीक केले होते. यातून आपली बदनामी झाल्याचा दावा मायकलनं केला होता. आता मात्र पुरावे नसल्यानं मायकल यांचा दावा कोर्टानं (court) फेटाळून लावला आहे. बेझोस यांनी कोर्टात सांगितलं, की आपण असे आरोप कधीच लावले नाहीत. बेझोस शुक्रवारी म्हणाले, की मायकलनं ते आणि त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन यांना फसवलं आहे. मायकलनं जवळपास 14 लाख रुपयांचा सौदा करत एका टॅब्लॉइडला बेझोस आणि लॉरेन यांच्यातील खासगी संभाषण विकलं. मायकलचे वकील टॉम वॉरेन यांच्या म्हणण्यानुसार, बेझोस यांनी केलेला दावा अतिशय खोटा आणि भयंकर चुकीचा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amazon, Photos

    पुढील बातम्या